- September 25, 2022
- No Comment
चिंचवडच्या भाजी मंडईतून वृद्ध नागरिकांचे दोन आयफोन चोरीला
चिंचवडः चिंचवडच्या भाजी मंडईमधून 60 वर्षीय आजोबांचे 2 आयफोन चोरीला गेले आहेत. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय रमनलाल देवदास (वय 60, रा. निगडी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजी खरेदीसाठी फिर्यादी गेले असता गणपती उत्सवामुळे मंडईमध्ये गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी फिर्यादी यांच्या खिशातून 95 हजार रुपये किंमतीचे 2 आयफोन चोरले. यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.