- September 28, 2022
- No Comment
पुणे: झेड ब्रीजखाली झालेल्या खुनातील आरोपी अवघ्या चोवीस तासात गजाआड,डेक्कन पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

पुणे: झेड ब्रीजखाली सोमवारी (दि.26) एका लॉन्ड्री चालकाचा खून झाला होता. या प्रकरणातील तीनही आरोपींना पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात जेरबंद केले आहे. सदरची कामगिरी डेक्कन पोलिसांनी केली आहे.
गणेश सुरेश कदम (वय 35) असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून नरेश गणेश दळवी (वय 30), अजय शंकर ठाकर (वय 25), समीर कैलास कारके (वय 26), सर्व राहणार उर्से, मावळ अशी अटक आरोपींची नावे आहेत. हा खून कौटुंबीक कारण व मालमत्तेच्या वादातून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.25) गणेशचा धारदार शस्त्राने खून झाल्याचे समोर आले होते. यावरून पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केली व परिसरातील सीसीटीव्ही व प्रत्यक्ष साक्षीदारांच्या माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणातून संशयीत आरोपींना डेक्कन पोलिसांनी उर्से येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता कौटुंबीक व मालमत्तेच्या वादातून हा खून केल्याचे त्यांनी कबूल केले. त्यानुसार आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार शिंदे, सहायक निलेश पाटील, पोलीस अमंलदार गभाले, निकाळजे, बोरसे, बडगे,भांगले, बोरकर, शेखर कौटकर, सोमावणे, राम गरूड, लोखंडे, रोहीत मिरजे, गणेश तरंगे, गणेश चोबे, महिला पोलीस अमंलदार धनश्री सुपेकर, विशाखा कांबळे, स्मिता पवार, आरती कांबळे, सुप्रिया सोनावणे यांनी केली.