• September 30, 2022
  • No Comment

अखेर चांदणी चौकातील पूल पाडण्याचे नियोजन झाले, पहा वाहतुकीचे बदल

अखेर चांदणी चौकातील पूल पाडण्याचे नियोजन झाले,  पहा वाहतुकीचे बदल

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा पूल पाडण्यात येणार असल्याने सदरचे काम करतेवेळी सर्व प्रकारच्या वाहनांना तिथून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.

चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडणार असल्याने 1 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजल्यापासून ते 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत किंवा आवश्यकतेनुसार पूल पाडण्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही उर्से टोलनाका येथे थांबविण्यात येणार आहे. साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक ही खेड शिवापुर टोल नाक्याजवळ थांबविण्यात येणार आहे. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी ते उर्से टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे.

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डुक्कर खिंड ते घोडावत चौक (पिंपरी चिंचवड आयुक्तालय) या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे.

त्यासाठी पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे:

मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनासाठी मुंबईकडून येणारी हलकी व प्रवासी चार चाकी वाहने उर्से टोलनाका येथून जुन्या पुणे मुंबई रस्त्याने भक्ती शक्ती चौक, नाशिक फाटा, बोपोडी चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक, संचेती हॉस्पिटल चौक, खंडूजी बाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग.

वाकड चौक डावीकडे वळून राजीव गांधी पुलावरून विद्यापीठ चौक, संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजी बाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदा मार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग.

राधा चौक डावीकडे वळून बाणेर रोडने विद्यापीठ चौक, उजवीकडे वळून संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजी बाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदा मार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले डावीकडे वळून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग.

साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनांकरिता पर्यायी मार्ग:

खेड शिवापुर टोल नाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, पुणे सातारा रोडने जेधे चौक, डावीकडे वळून सारसबाग, पुरम चौक, डावीकडे वळून टिळक रोडने खंडोजी बाबा चौक, फर्ग्युसन रोडने वीर चाफेकर चौक, डावीकडे वळून विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरून औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई बंगलोर राष्ट्रीय महामार्ग.

खेड शिवापुर टोल नाका शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगाव पूल अंडरपास, सिंहगड रोडने राजाराम पूल, डीपी रोड मार्गे नळ स्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरून औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई बंगलोर राष्ट्रीय महामार्ग.

 

खेड शिवापुर टोल नाका शिंदेवाडी जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगाव पूल, वारजे पूल अंडरपास, आंबेडकर चौक, वनदेवी चौक, कर्वे पुतळा चौक, नळ स्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरून औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग.

अशा प्रकारे वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.

 

 

 

Related post

चरस, गांजाची विक्री करणारा टोळका जेरबंद, अंमली पदार्थ विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी, चव्वेचाळीस लाखाचा माल हस्तगत

चरस, गांजाची विक्री करणारा टोळका जेरबंद, अंमली पदार्थ विरोधी…

पुणे : कात्रज परिसरातून चरस, गांजाचा मोठा साठा जप्त; अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेल्या अरुण अरोराकडून 44 लाखाचा माल हस्तगत कात्रज: अंमली…
फरार अट्टल गुन्हेगार व त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाई,वारजे माळवाडी पोलिसांची लोणावळ्यात कारवाई

फरार अट्टल गुन्हेगार व त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाई,वारजे माळवाडी…

वारजे: जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी सह साथीदारांवर मोक्का कारवाई केली. त्यातून तो जामीनावर सुटल्यानंतरही त्याची गुन्हेगारी थांबत…
पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अजुन अस्पष्ट

पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अजुन अस्पष्ट

भोसरी: पिंपरी-चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी परिसरात प्लास्टिक आणि रबर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *