Entries by [email protected]

पुण्यात प्रियकराच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अल्‍पवयीन प्रेयसीकडून कोयत्याने वार


पुणे : प्रियकराच्या खुनाचा बदला घेण्यासाठी 17 वर्षीय प्रेयसीने 19 वर्षीय तरुणावर हातात कोयता घेऊन प्राणघातक हल्ला केला.हडपसर परिसरातील काळेपडळमध्ये रविवारी हा प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तरुणीसह चौघेजण अल्पवयीन आहेत. विठ्ठल धनंजय चौगुले (वय 19), ऋषिकेश उर्फ जंगल्या भारत पांचाळ (वय 20) आणि चैतन्य […]

सावकारी प्रकरणातुन आरोपीस अटक पुर्व जामीन मंजुर


पुणे : सावकारकी करतो व फसवतो असे म्हणून खोटया गुन्हा फिर्यादी हिने तृप्ती देसाई यांच्या संघटनेमार्फत (भू – माता ब्रिगेड ) गुन्हा शिरूर पोलीस स्टेशन येथे दाखल केला आरोपी अजित कोंडे अटक पुर्व जामीन अर्ज दाखल केला व सदरील अर्ज मे. सत्र न्यायालय पुणे यांनी मंजुर केला आहे. आरोपीच्या वतीने अॅड. नितीन कदम यांनी युक्तीवाद […]

लष्कर ए तोयबाच्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला पुण्यातून


पुणे :पुणे दहशतवादी विरोधी पथकाकडून पुण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. लष्कर ए तोयबाच्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला दापोडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. जुनेद मोहम्मद असं 28 वर्षीय तरुणाचे नाव आहे.  या कारवाईत अटक केलेल्या तरुणाचे नाव मोहम्मद जुनेद आहे. तो एका मदरशाजवळ राहत होता.  लष्कर ए तोयबाच्या जम्मू येथील आफताब शहा आणि उमर या […]

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जंयतीनिम्मित्त बैलगाडा शर्यत


कदमवाकवस्ती : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जंयतीनिम्मित्त उरुळी देवाची शेवाळेवाडी(ता.हवेली) येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन शेवाळेवाडी ग्रामस्थ संघर्ष प्रतिष्ठाण,पुणे शहर तसेच शिवप्रेमी मित्र मंडळ,शेवाळेवाडी यांच्या वतीने करण्यात आले.यावेळी मांगडेवाडी येथील सुभाष मांगडे व उत्तम गवळी यांच्या बैलगाड्याने प्रथम क्रमांक मिळवला.अजित भेगडे यांनी दुसरा,आनंद रेटरे यांनी तिसरा,अरविंद धनावडे यांनी चौथा तर बिटु शेवाळे यांनी पाचवा क्रमांक […]

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई : नायगाव, एन. एम. जोशी मार्ग आणि वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या चाळींमध्ये सन 2011 च्या आधीपासून पोलीस सेवा निवासस्थानात राहात असलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना बांधकाम दराने ही घरे देता यावीत यासाठी गृहनिर्माण विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना  मुख्यमंत्र्यांनी […]

जीएसटी घोटाळाप्रकरणी एकास अटक


मुंबई : खोटी बिले देऊन शासनाची करोडो रूपयांची महसूली हानी करणाऱ्या करदात्यांविरोधात शासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत  मे.एस.एस. सर्व्हिसेस या प्रकरणाचा तपास करून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शशांक वैद्य यांना अटक करण्यात आली असल्याचे वस्तू व सेवा कर विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. मे.एस.एस. सर्व्हिसेससह अन्य पाच बोगस कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे 88 कोटी […]

पुण्यातील धक्कादायक प्रकार! पत्नीला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास पतीने भाग पाडले ; पतीसह दोन जणांवर गुन्हा दाखल


पुणे :पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बुधवारी उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीला आपल्या दोन मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. शारीरिक संबंध ठेवत असताना पती स्वतः त्या ठिकाणी उभा राहून हे सर्व पाहत होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पती आणि त्याच्या दोन साथीदारांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात […]

चायनीज हातगाडीवाल्यांकडून आठ महिन्यांपासून खंडणी घेणाऱ्याला अटक


पिंपरी चिंचवड : चायनीज हातगाडी चालकाकडून आठ महिन्यांपासून एक व्यक्ती दररोज 300 रुपये खंडणी घेत होता. खंडणी घेऊनही त्याने हातगाडी बंद करण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार मागील आठ महिन्यांपासून 16 मे 2022 पर्यंत हिंजवडी फेज एक येथे आदित्य चायनीज सेंटर या हातगाडीवर घडला. अतुल उर्फ काळू […]

1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील चौघांना गुजरातमध्ये अटक; गुजरात दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई


अहमदाबाद : मुंबईमध्ये 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी “वॉन्टेड’ असलेल्या चार जणांना गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. तसेच पोलिसांनी चार आरोपींची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. अबू बकर, सय्यद कुरेशी, मोहम्मद शोएब कुरेशी उर्फ शोएब बावा आणि मोहम्मद युसूफ इस्माईल उर्फ युसूफ भटका अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण मूळचे मुंबईचे रहिवासी […]

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश


मुंबई :- राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी दिनांक 1 मे नंतर गाळप झालेल्या […]

सराईत गुंड नीलेश घायवळ टोळीतील मोक्कातील फरारी आरोपीस अटक


पुणे : सराईत गुंड नीलेश घायवळ टोळीचा सदस्य व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोक्का) कारवाई झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली. आरोपीविरुद्ध विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. समीर बाळू खेंगरे (वय २४, रा. आशिष गार्डन चौक, कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या वरिष्ठ […]

सिंहगडावरील ई-बस सेवेला तात्पुरती स्थगिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश


पुणे : अरुंद रस्ते, जागेवरचे अवघड वळण, चढता घाट, तीव्र उतार यामध्ये बसेसचे चार्जिंग मोठ्या प्रमाणात खर्ची पडत आहे. परिणामी वारंवार बस रस्त्यातच बंद पडत आहेत. तसेच अपघाताचा धोका निर्माण झाल्याने ई बस सेवा काही काळापुरती बंद करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसेच बसेसची संख्या व चार्जिंग पॉइंटची संख्या वाढविणे आवश्यक आहे. […]

प्रति महिना 40 टक्के व्याज घेणाऱ्या २ खासगी सावकारांना अटक


पुणे : शेळ्या बकऱ्यांचा व्यवसाय करण्याकरिता घेतलेले 3 लाख रुपये कर्ज 40 टक्के प्रतिमहिना वसूल  करून वर्षभरात 17 लाख रुपये वसूल करणाऱ्या सावकारास गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत एका महिलेने गुन्हे शाखा युनिट 6 कडे तक्रारी अर्ज दिला होता. त्यानुसार पोलिसांनी दोन खासगी सावकार यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा […]

मेट्रो कारशेडचे काम करणाऱ्या कामगाराचा ५० फूट उंचीवरून पडून मृत्यू ; कोथरुडमधील घटना


पुणे : पुण्यात मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना ५० फूट उंचीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला आहे.ही घटना रविवारी रात्री उशिरा पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ घडली. मूलचंद्रकुमार सीताराम (रा. उत्तर प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ […]

भाडेतत्वावर मोटार घेऊन त्याची परस्पर विक्री करणाऱ्या दोघांचा पर्दाफाश, ३० लाखाचा मुद्देमाल जप्त


पुणे : सर्व सामान्य लोकांना विश्वासात घेवुन त्यांच्या चारचाकी गाड्या भाडेतत्वावर चालवण्यासाठी  घेऊन त्याची परस्पर विक्री करून फसवणुक करणा-या आरोपींना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी बेडया ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून २९ लाख ५० हजार रुपये किमतीच्या एकुण ०८ फोर व्हिलर गाडया जप्त करण्यात आल्या आहेत. सुमित यादवराव खेरडे, वय ३० वर्षे […]