बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना अटक, 2 पिस्टल आणि 10 जिवंत काडतुसे जप्त
पुणे : विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या दोन गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथक एकने अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे 2 पिस्टल आणि 10 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.त्याच्याकडून 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दत्तवाडी येथील लोखंडी पुलाजवळ मंगळवारी (दि.14) केली.
विशाल ज्ञानेश्वर रेणुसे (वय 26 रा. मोरया हेरिटेझ, 225 शुक्रवार पेठ, पुणे) आणि आकाश कुमार शेटे (वय 22 रा. शुक्रवार पेठ, भदानेवाडा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पेट्रोलिंग करत असातना दोन तरुण दत्तवाडी येथील लोखंडी पुलाजवळील आनंदमठ येथे येणार असून त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती पथकला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता कंबरेला पाठिमागे दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि 10 जिवंत काडतुसे आढळून आली. आरोपींविरुद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदिप बुवा करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे , पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस अंमलदार नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, नितीन रावळ, विवेक जाधव, दुर्योधन गुरव, हनुमंत कांदे यांच्या पथकाने केली.