देश

पोलीस असल्याचे सांगून मुलीसोबत एकट्या राहणा-या महिलेवर बलात्कार


पिंपरी चिंचवड : पोलीस असल्याचे सांगून मुलीसोबत एकट्या राहणा-या महिलेला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. यातून महिला गरोदर राहिली असता तिचा गर्भपात केला. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2020 ते 2 जानेवारी 2022 या कालावधीत साखरेवस्ती, भोसरी आणि हिंजवडी फेज एक येथे घडला आहे.

आकाश प्रकाश पांढरे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने 26 फेब्रुवारी 2022 रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या मुलीसोबत राहते. ती एकटी असल्याचा आरोपीने गैरफायदा घेतला. आरोपी आकाश याने तो पोलीस असल्याचे सांगून महिलेला धमकी देऊन ‘तू एकटी कशी राहतेस बघतो’ असे म्हणून महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. आकाश याने फिर्यादी महिलेसोबत वारंवार जबरदस्ती व अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. त्यापासून फिर्यादी महिला गरोदर राहिली. हे माहिती झाल्यानंतर आरोपीने फिर्यादीला गर्भपाताच्या गोळ्या खायला लावून गर्भपात घडवून आणला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक पूजा कदम तपास करीत आहेत.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला ‘सर्वोच्च’ धक्का, स्थानिक निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवायच


 

नवी दिल्ली :  ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला मोठा दणका बसला आहे. महाराष्ट्रातील ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात तीन महिन्यांचा वेळ मागितला होता.

पण निवडणुक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास सुप्रीमो कोर्टाने नकार देत,  निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत, असं म्हटलं आहे. त्यामुळे १०५ नगरपंचायतींची निवडणुक ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहे. तर उर्वरीत निवडणुकांबद्दलचा निर्णय  17 जानेवारीला घेतला जाईल.  27 टक्के आणि आधीच्या 73 टक्के जागांवरचा निकालही एकाच दिवशी लावला जावा, असं कोर्टाने म्हटलं आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

महाराष्ट्र शासनाने आवश्‍यक आकडेवारीची जुळवाजुळव न करताच हे आरक्षण दिले होते. या जागा सामान्य वर्गात परिवर्तीत करण्यात आल्या आहेत, अशी नवीन अधिसूचना काढण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहे.

महाराष्ट्र सरकारने ट्रीपल टेस्टचे पालन न करता ओबीसीला 27 टक्के आरक्षण देणारा अध्यादेश आणला. या अध्यादेशाचा स्वीकार केला नाही जाऊ शकत. यामुळे आरक्षण देता येणार नाही. सरकार ओबीसी आयोग स्थापन करीत नाही आणि आवश्‍यक डाटा गोळा करीत नाही तोपर्यंत अध्यादेशाची अंमलबजावणी होऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र निवडणूक आयोगाने आरक्षणाशिवाय निवडणुकीचा कार्यक्रम राबवावा लागणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारने इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी मागितला आहे. राज्याने केंद्राकडे इम्पिरिकल डाटा देण्याची मागणी केली होती. परंतु, हा डाटा देता येणार नाही, असे केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले.

राज्य सरकारला धक्का

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारला मोठा झटका बसलाय. इम्पेरिकल डेटा देण्यासंदर्भात राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टात फेटाळण्यात आलीय. इम्पेरिकल डेटा देऊ शकत नाही असं प्रतिज्ञापत्राद्वारे सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने स्पष्ट केलं होतं. त्याआधारे सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली आहे. केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा द्यावी ही याचिका राज्य सरकारने केली होती. ती सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलीय. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर प्रश्नचिन्हं उभं राहिलं आहे. दरम्यान राज्य सरकारनं राज्य सरकार ३ महिन्यात डेटा गोळा करण्यास तयार असल्याचं कोर्टात सांगितलंय.

देशातील रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारचे माझे रेशन मोबाइल App लाँच, एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती


नवी दिल्ली : वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेप्रमाणेच आता मोदी सरकारकडून Mera Ration नावाचे Mobile Appसुरू करण्यात आले आहे. ज्यात गरजू म्हणजेच गरीब कुटुंबाच्या लोकांना Fair Price Shop सोबत रेशन कार्ड मध्ये आपली सध्याच्या स्थिती आणि रेशन कार्डमधील सर्व माहिती मिळू शकणार आहे. Mera Ration mobile app ला Androd Smartphones साठी लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे युजर्स याला गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकतात. सध्या भारतात कुटुंबातील एका सदस्याकडे तरी स्मार्टफोन असतो. त्यामुळे मोबाइलवर सरकारी स्कीम आणि मिळणारा लाभ याची पूर्ण माहिती मिळू शकते.

One Nation-One Ration Card च्या पावलावल पाऊल टाकत आता Mera Ration मोबाइल अॅप लाँच करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्हाला रेशनसंदर्भातील सर्व कामे आता ऑनलाईन करता येणार आहेत. रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळते. मात्र ज्यावेळी एखाद्या कुटुंबाचे दुसऱ्या राज्यात स्थलांतर होते. अशावेळी त्याला स्वस्त धान्य मिळण्यास अडचणी येतात. नेमक्या याच अडचणी आता या अ‍ॅपच्या माध्यमातून दूर होणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.

माझे रेशन अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही नव्या रेशन कार्डसाठी नोंदणी करू शकता, नवे रेशन कार्ड डाऊनलोड करू शकता. तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक आहे की नाही ते देखील पाहू शकता. आधार जर लिंक नसेल तर तुम्ही स्व:ता तुमचे आधार अ‍ॅपचा वापर करून रेशन कार्डला जोडू शकता. यासोबतच आतापर्यंत तुम्हाला किती धान्य वितरीत करण्य़ात आले आहे, तुमच्या जवळ कुठे-कुठे स्वस्त धान्य दुकान आहे? याची माहिती देखील तुम्हाला मिळू शकते. जर तुम्हाला तुमचा स्वस्त धान्य दुकानदार बदलायचा असेल तर तो देखील तुम्ही या अ‍ॅपच्या मदतीने बदलू शकता.

माझे रेशन अ‍ॅप हे नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोनही वाचणार आहे. रेशन कार्ड काढायचे झाल्यास किंवा त्याची नोंदणी करायची झाल्यास मोठ्याप्रमाणात कागदपत्रे सादर करावे लागत होते. तसेच त्यासाठी तालुक्याच्या गावी जावे लागत होते. मात्र आता तुम्ही घरबसल्या अवघ्या काही मिनिटांमध्ये कमीत कमी कागदपत्रांमध्ये नोंदणी करू शकणार आहात. तसेच रेशन कार्ड तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी बराच कालावधी लागत होता. मात्र आता या अ‍ॅपमधूनच ते डाऊनलोड होणार असल्याने वेळेत देखील मोठी बचत होणार आहे. सोबतच तुम्ही जर इतर राज्यात स्थलांतर केले तर, या अ‍ॅपवर स्थलांतरणाचा देखील पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.  त्यावर जाऊन तुम्ही राज्याची आणि शहराची नोंदणी केली की तुम्हाला राशन मिळू शकते.

असे करा डाउनलोड

Mera Ration mobile appचा वापर सोपा आहे. सर्वात आधी हे अॅप डाउनलोड करा. गुगल प्ले स्टोरवर तुम्हाला Central AEPDS Team) द्वारा डिवेलप केलेले अॅप मिळेल. डाउनलोड झाल्यानंतर आपला मोबाइल नंबर यात रजिस्टर करा. रजिस्टर झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड नंबर मागितले जाईल. नंबर टाकल्यानंतर सबमिट करा. मग रेशन कार्ड संबंधी सर्व माहिती मिळू शकेल. या अॅपवर गेल्या सहा महिन्यातील ट्रान्झॅक्शन आणि आधार सीडिंगची पूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या मोबाइलवर मिळू शकेल.

देशाला हादरवणारा अपघात! हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये संरक्षणदलाचे सर्वोच्च प्रमुख बिपीन रावत यांचे निधन

चेन्नई : भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवाई दलाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन याबबतची माहिती देण्यात आली आहे.या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  (CDS) बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कर अधिकारी असे एकूण 14 जण प्रवास करत होते. कुन्नूरमधल्या जंगल भागात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला.  लष्कराचं IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर होते अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत

हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्याला भीषण लागली. या अपघातात देशाचे पहिले chief of defence staff बिपीन रावत यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय या दुर्घटनेमध्ये 11 मृतदेह आतापर्यंत सापडल्याची माहिती मिळाली आहे.

सुलूरमधून कुन्नूरला परतत होतं हेलिकॉप्टर
CDS बिपीन रावत पत्नी मधुलिका रावत यांच्यासह वेलिंगटन इथं एका कार्यक्रमात सहभागी होण्यास गेले होते. वेलिंग्टनमध्ये लष्कराचं महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात बिपीन रावत यांचं लेक्चर होतं. या कार्यक्रमानंतर बिपीन रावत दिल्लीला रवाना होणार होते.

कुन्नूर इथल्या घनदाट जंगलात हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघात झाल्याच्या चारही बाजूंनी आगीचे लोळ दिसत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती मिळताच तिथे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं.

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज यावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर लष्कर प्रमुख मनोज नरावणे यांनी संरक्षणमंत्र्यांशी चर्चा केली.

हेलीकॉप्टर मध्ये कोण कोण होते?

जनरल बिपिन रावत, CDS, मधुलिका रावत, बिपिन रावत यांच्या पत्नी, ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक जीतेंद्र कुमार, लांस नायक विवेक कुमार, लांस नायक बी साई तेजा, हवालदार सतपाल

कोण होते सीडीएस जनरल बिपीन रावत?

2016 साली बिपीन रावत हे लष्करप्रमुख झाले. लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग 31 डिसेंबर 2016ला सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या जागी रावत यांची नेमणूक करण्यात आली होती.

बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांची 1 सप्टेंबर 2016 रोजीच सेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.

बिपीन रावत यांचे वडिलही नि. लेफ्टनंट जनरल एल एस रावत हे सेनेच्या उपप्रमुखपदावर निवृत्त झाले होते.

रावत हे डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झालेले ‘बेस्ट कॅडेट’ ठरले.

रावत यांना ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं.

सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल सारख्या अनेक पुरस्कारांनी रावत यांना गौरवण्यात आलं आहे.

 

IAF Mi-17V5 अत्यंत सुरक्षित हेलिकॉप्टर 
दोन इंजिन असलेलं IAF Mi-17V5 हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजलं जातं. पण तरीही हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने, त्याबाबतच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.  हे हेलिकॉप्टर रशियन बनावटीचं आहे. सैन्य दल आणि व्हीआयपींसाठी हे हेलिकॉप्टर मुख्यत्वे वापरलं जातं

Instant PAN: 10 मिनिटात मिळणार पॅनकार्ड , जाणून घ्या कसा करावा अर्ज


मुंबई : आजच्या दिवसांमध्ये सर्वच छोट्या मोठ्या कामांसाठी पॅन कार्डची गरज भासत असते. पॅन कार्ड शिवाय अनेक महत्त्वाची कामे रखडली जातात. परिणामी प्रचंड नुकसानाचा सामना तर कारावा लागतो. मात्र पॅन कार्ड नसल्यामुळे वेळ देखील वाया जातो. पण आता तुम्हाला अर्जंट पॅनकार्डची आवश्यकता असेल तर तुम्ही केवळ 10 मिनिटात सुद्धा पॅनकार्ड मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड आणि मोबाईल नंबरच्या मदतीने अर्ज करावा लागेल.  आता instant PAN Card मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी देण्याची देखील गरज नाही.

काय आहे  instant PAN Card

इनकम टॅक्स विभागाने आपलं ई-फायलिंग पोर्टलवर एक नवीन प्रक्रिया सुरु केली आहे, ज्यात आधार नंबर आणि पॅनकार्डचं आकलन केलं जातं. ही सुविधा तेव्हाच घेता येऊ शकते, जेव्हा खालील अटी आणि शर्थी तुम्ही पूर्ण कराल.

 

1. या आधी तुम्ही पॅनकार्ड घेतलेलं नसावं

2. तुमचा मोबाईलनंबर तुमच्या आधारशी लिंक असावा

3. आधार कार्डवर तुमची जन्म तारीख, महिना आणि वर्ष यांची नोंद दिसली पाहिजे

4. पॅनकार्डसाठी अर्ज करताना तो अल्पवयीन नसावा.

या सोप्या स्टेप करा फॉलो

-Instant e-PAN कार्डसाठी प्रथम ‘Instant PAN through Aadhaar’ सेक्शनवर किक्ल करा.

आता ‘Get New PAN’ ऑपशनवर क्लिक करा.

– आता आधार कार्ड नंबर नोंदवा. नंतर Captcha नोंदवा.

– नंतर लिंक्ड मोबाइल नंबरद्वारे ओटीपी generate होईल.

– यानंतर कार्ड अ‍ॅप्लीकेशनमध्ये email ID चे ऑपशन भरा.

– नंतर आधार नंबर आणि मोबाइल नंबर UIDAI सोबत ई-केवायसी सामायिक होईल.

– नंतर पॅन नंबर Generate होईल.

– आता Check Status/ Download PAN वर जाऊन आधार नंबर सबमिट करा.

– नंतर मेल आयडीद्वारे पॅनचे PDF डाऊनलोड करता येईल.

NSDL च्या वेबसाईटवरून सुद्धा करू शकता अर्ज –

जर तुम्हाला पॅनकार्डची तातडीने गरज नसेल तर तुम्ही NSDL च्या वेबसाइटवर जाऊन पॅनकार्डसाठी अप्लाय करू शकता. यासाठी नॉर्मल प्रोसेस करावी लागेल. जी पूर्ण केल्यानंतर 15 ते 20 दिवसात PAN Card कुरियर किं पोस्टाने घरी येईल.

ज्यांनी यापूर्वी पॅनकार्ड काढलं आहे, त्यांच्यासाठी ही सेवा नाहीय.

ATM मधून पैसे काढण्यासाठी नियम बदलले,जाणून घ्या संपूर्ण माहिती


मुंबई : एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. ATM व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी SBI ने एक नवीन पुढाकार घेतला आहे. ज्यामध्ये आता तुम्हाला ATM मधून पैसे काढण्यासाठी OTP टाकावा लागेल. या नवीन नियमात ग्राहकांना OTP शिवाय पैसे काढता येणार नाहीत. रोख रक्कम काढण्याच्या वेळी, ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवर एक ओटीपी मिळेल, जो टाकूनच एटीएममधून पैसे काढता येतील.

बँकेने ट्विट करून याबद्दल ग्राहकांना माहिती दिली आहे. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “एसबीआय एटीएममधील व्यवहारांसाठी आमची ओटीपी आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली हे फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध एक लसीकरण आहे. फसवणुकीपासून तुमचे संरक्षण करणे हे नेहमीच आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल. SBI ग्राहकांनी OTP आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली कशी कार्य करेल हे माहित करुन घ्या.”

नियम काय आहेत?

देशातली सर्वांत मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने रोख व्यवहारांबाबत महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. हे नियम अशा व्यक्तींसाठी आहेत, की जे एटीएममधून 10,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम काढत आहेत.या नियमानुसार, तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम एटीएममधून काढत असाल तर त्यासाठी ओटीपीची गरज भासेल. ओटीपीमुळे ग्राहकाची फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ओटीपीच्या आधारे पैसे काढण्याला प्राधान्य दिलं जात आहे. एटीएम कार्डधारकाला दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम काढायची असेल, तर त्याने रक्कम टाकल्यानंतर एटीएम स्क्रीनवर ओटीपी विंडो दिसेल. तेव्हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी ग्राहकाला नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी तेथे टाकावा लागेल.

बँकांच्या व्यवहारातली वाढती फसवणूक लक्षात घेऊन अशा प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत. स्टेट बँक त्यांच्या ग्राहकांसाठी वेळोवेळी अशा सेवेची घोषणा करत असते, जेणेकरून त्यांचे व्यवहार सुरक्षित आणि सुलभ व्हावेत. ओटीपीद्वारे पैसे काढणे, हादेखील त्याचाच एक भाग आहे. यासाठी बँक खात्यात नोंदणी केलेला मोबाइल क्रमांक पैसे काढताना तुमच्याकडे असला पाहिजे. कारण त्यावर ओटीपी येईल व तोच ओटीपी टाकून तुम्ही पैसे काढू शकाल.

एटीएममधून पैसे काढण्याची पडताळणी किंवा प्रमाणीकरण करण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांच्या पैशाची सुरक्षितता वाढते आणि पैसे चुकीच्या हातात जाण्यापासून रोखले जातात. ओटीपी आधारित रोख व्यवहार फक्त 10 हजारांपेक्षा जास्त रकमेसाठी आहेत, हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्यापेक्षा कमी पैसे काढल्यास एटीएममध्ये ओटीपी टाकण्याची गरज भासणार नाही.

एसबीआय त्यांच्या ग्राहकांना फसवणूक करणाऱ्यांपासून वाचवण्यासाठी सोशल मीडियावरून बँकेच्या सर्व उपक्रमांची आठवण करून देत आहे. गेल्या आठवड्यात बँकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, की ‘एसबीआयच्या एटीएममधल्या व्यवहारांसाठी ओटीपी आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध एक प्रकारचं लसीकरणच आहे. फसवणुकीपासून ग्राहकांचं संरक्षण करणे याला नेहमीच आमचं सर्वोच्च प्राधान्य असेल.’ बनावट किंवा अनधिकृत व्यवहारांची संख्या कमी करण्यासाठी 2020 मध्ये ओटीपी आधारित एटीएम व्यवहार सुरू करण्यात आला. ओटीपी-आधारित रोख पैसे काढण्याची सुविधा सुरू केल्यामुळे, स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या एटीएम सेवेद्वारे रोख पैसे काढण्यासाठी सुरक्षिततेचा आणखी एक स्तर जोडला आहे

बँकेने हे कशासाठी केलं?

ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवता यावे यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI कडे 22 हजार 224 शाखा आणि 63 हजार 906 ATM/CDM आहे. ज्याचे भारतात 71 हजार 705 BC आउटलेट आहे, जे सर्वात मोठे नेटवर्क आहे. इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या अंदाजे 91 दशलक्ष आणि 20 दशलक्ष आहे.

मोठी बातमी…! तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा, मोदींनी देशाची माफीही मागितली


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे. तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडोल आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश पर्व सोहळ्याचं निमित्त साधून देशाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देताना तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे.   शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत.  माझ्या सरकारनं शेतकरी हिताला प्राधान्य दिलं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख 62 हजार कोटी रुपये जमा केले. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत केली जात आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,  देशात तीन कृषी कायदे आणले. या मागील उद्देश शेतकऱ्यांना ताकत देण्याचा आहे. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांना खूप आभारी आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी पूर्ण ताकतीनं, समर्पण भावनेनं हे कायदे आणला आहे. इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. आम्ही या कायद्यांचं महत्व सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. विनम्रतेनं आम्ही त्यांच्या गोष्टी देखील समजून घेतल्या. यात आम्ही काही बदल देखील केले. दोन वर्षासाठी कायदे स्थगित करण्याचाही प्रयत्न केला. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे.

शेतकरी संघटनांचे मानले आभार

आमचं सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी पावलं उचलत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक सुधारावी आणि त्यांची सामजिक स्थिती चांगली व्हावी म्हणून इमानदारीने काम करत आहोत. आम्ही त्यासाठी तीन कृषी कायदे आणले होते. देशातील छोट्या शेतकऱ्यांना बळ मिळावं. त्यांना पिकांना योग्य दाम मिळावा आणि उत्पादन विक्रीसाठी बाजार मिळावा हा त्यामागचा हेतू होता. ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती. अनेक सरकारांनी यापूर्वी त्यावर मंथन केलं होतं. यावेळीही संसदेत चर्चा झाली आणि कायदा आणला. देशातील कोट्यावधी शेतकरी आणि संघटनांनी त्याचं स्वागत केलं. मी त्यांचा आभारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

देशात 100 पैकी 80 शेतकरी हे छोटे शेतकरी

दीड वर्षानंतर करतारपूर साहीब कॅरिडोअर पुन्हा उघडला आहे. गुरुनानक म्हणाले होते की संसारात सेवेचा मार्ग अवलंबल्यानेच जीवन सफल होतं. आमचं सरकार याच भावनेतून देशवासियांची सेवा करत आहे. अनेक पिढ्या जी स्वप्नं पाहत होती. भारत आज ती स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. पाच दशकाच्या सार्वजनिक जीवनात मी शेतकऱ्यांच्या अडचणी जवळून पाहिल्या आहेत. समजल्या आहेत. त्यामुळे 2014मध्ये पंतप्रधान म्हणून सेवेची संधी मिळताच कृषी विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिलं. देशाच्या 100 पैकी 80 शेतकरी हे छोटे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे. हे वास्तव आहे. ही संख्या 10 कोटीपेक्षा अधिक आहे. ही जमीन हेच त्यांच्या जीवनाचा आधार आहे. हेच त्यांचं आयुष्य असतं. ते याच जमिनीच्या माध्यमातून कुटुंबाचा पालनपोषण करत असतात. मात्र, कुटुंब वाढतं तसंच त्यांची शेती कमी होते. त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी बियाणे, बचत आणि बियाणांवर आम्ही काम केलं, असं त्यांनी सांगितलं.

कृषी बजेट पाचपट वाढवला

आम्ही शेतकरी उत्पादन वाढवलं. आम्ही पीक विमा योजना अधिक प्रभावी बनवली,. त्यात सर्वांना आणलं. संकटाच्या काळात अधिकाधिक शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी नियम बदलले. त्यामुळे गेल्या चार वर्षात एक लाख कोटी लोकांपेक्षा अधिक नुकसान भरपाई आम्ही शेतकऱ्यांना दिला आहे. आम्ही छोटे शेतकरी आणि मजुरांपर्यंत विमा आणि पेन्शन सुविधा दिली. आम्ही शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी 1 लाख 62 हजार कोटी रुपये ट्रान्सफर केले. त्यांच्या खात्यात. शेतकऱ्यांना उत्पादनावर चांगली किंमत मिळावी म्हणून अनेक पावले उचलली. आम्ही एमएसपी वाढवली. आणि खरेदी केंद्रही वाढवले. आम्ही देशभरातील कृषी बाजारांचं आधुनिकीकरण केलं. त्यावर कोट्यावधी रुपये खर्च केले. आम्ही कृषी बजेट पाच पटीने वाढवलं. आम्ही सवा लाख कोटी दरवर्षी शेती क्षेत्रावर खर्च करत आहोत. छोट्या शेतकऱ्यांची ताकद वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, असंही त्यांनी सांगितलं.

काय होते तीन कृषी कायदे

पहिला कायदा 
शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020 

दुसरा कायदा 
शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020

तिसरा कायदा – अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा 2020

आधार कार्डमध्ये किती वेळा करता येईल बदल ? – जाणून घ्या महत्वाचे नॉलेज अपडेट


मुंबई : जर आपल्याला आधार कार्डमधील नाव, पत्ता, लिंग किंवा जन्म तारीख बदलायची असेल – तर त्यात किती वेळा बदल करता येणार ते आपण या मॅसेज मध्ये सविस्तर समजून घेऊ

किती वेळा करता येईल बदल ?

● नाव – नावात केवळ दोन वेळा करेक्शन करता येणार

● जन्म तारीख – मध्ये एकदाच करता येणार करेक्शन

● पता – पत्ता बदलायचा असल्यास त्यासाठी कोणतीही मर्यादा नाही

● लिंग – केवळ एकदाच बदल करता येणार

● मोबाइल नंबर – मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही

● फोटो – जर आपला फोटो क्लियर नसेल किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे फोटो बदलायचा असेल तर फोटो कितीही वेळा बदलता येणार – असे UIDAI ने सांगितले

आधार कार्डमध्ये किती वेळा बदल करता येणार – हि माहिती सर्व नागरिकांसाठी, नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा

डेहराडूनमध्ये झालेल्या नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये पुणे संघाचे भरघोस यश


मुंबई : ऑल इंडिया सिकोकाई कराटे या संस्थेद्वारे उत्तराखंड डेहराडून येथे २७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर दरम्यान आयोजित केलेल्या कराटे स्पर्धेत देशातून विविध राज्यातून एक हजारहून खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये महाराष्ट्रातुन ५५ खेळाडूंनी सहभाग दर्शविला.त्यामधील काता व कुमिते या दोन प्रकारामध्ये ७ सुवर्ण,१०रौप्य,३४ कांस्य अशी एकूण ५१ पदके महाराष्ट्रातील खेळाडूंनी पटकावली.यासाठी कराटे प्रशिक्षक प्रदीप वाघोले, हेमंत डोईफोडे,राम सोनुने व तेजस वाघोले या सर्वांनी मार्गदर्शन केले.
या स्पर्धेत हर्षिका खामकर,कशिश घाडगे,आशिष राऊत,खुशबू जेस्वाल,सिद्धी पोमण,आदिती देवाडे,देवश्री पवार या खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकावले.

तर अलोक पवार,नंदिनी भोईटे,श्रावणी काळे, प्रणिता इंगोले,कार्तिकी शिंदे,भूमिका खंडाळे,मेघना मुंगसे,वैभवी दाते, सिद्धी धनावडे,अमृता पोमण हे रौप्यपदकाचे मानकरी ठरले.कांस्यपदक नंदिनी चव्हाण,निखिल काबंळे,वैभव रसाळ,अभिषेक जाधव,चैतन्य कुंभार,रुद्रांश फराटे,अनुष्का,भोसले,दिव्या चव्हाण,निरजा कुर्रा,ऐश्वर्य महाल्ले, ख़ुशी जेस्वाल,राजवीर शिंदे,साहिल बनकर,आदित्य सूर्यवंशी,तनिष्का पवार,दिक्षा भोसले,अभिषेक राऊत,ओंकार गांगार्डे,प्रणव बुर्डे,गणेश पापळ,सिद्दार्थ कांबळे,अनिल पवार, अंकित कुंभार,गार्गी तांबडे,मृणाली गार्गी,कोमल केदारी,शरयू होले,सिद्धी काशीद,कोमल खेनट,दिव्या चव्हाण,प्राजक्ता मुसळे, आदिती बनकर,रिया चव्हाण,वैष्णवी ताम्हाणे यांनी पटकावले.सर्व विजेता खेळाडूंची निवड आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी झाल्याने सर्वच खेळाडूचे अभिनंदन व कौतुक विद्यार्थीपालक, राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातून होत आहे.

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं निधन, 46 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


कन्नड कलाविश्वातील  प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमार  यांचं cardiac arrest मुळे निधन झालं आहे. आज सकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना बंगळुरू येथील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.  क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद आणि बॉलिवूड अभिनेता सोनू सोद यांनी पुनित राजकुमार यांच्या निधनाच्या वृत्ताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुनित राजकुमार यांना छातीत दुखत असल्यामुळे बंगळुरुतील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुनीत राजकुमार यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर सतत देखरेख ठेवून होती. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पुनीत राजकुमार यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. टॉलिवूडपासून बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातूनही श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पुनीत राजकुमार यांच्या निधनानं टॉलिवूडमध्ये मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज एस. बोम्मई यांनी पुनीत राजकुमार यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विक्रम हॉस्पिटल गाठलं होतं.

कोण आहे पुनीत राजकुमार?

पुनीत राजकुमार हे दाक्षिणात्य कलाविश्वातील प्रसिद्ध आणि मोठं नाव आहे. पुनित राजकुमार यांना चाहते प्रेमाने अप्पु म्हणत. पुनित दिग्गज अभिनेते राजकुमार आणि Parvathamma यांचा मुलगा होय. पुनित राजकुमार यांनी २९ पेक्षा जास्त कन्नड चित्रपटात अभिनय केला आहे.  बाल कलाकार म्हणून पुनित यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता. ‘अभी’, अप्पू, ‘वीरा कन्नडिगा’, ‘अजय’, ‘अरासु’, ‘राम’, ‘हुडुगारु’ आणि‘अंजनी पुत्र’ यासारख्या चित्रपटात काम केलं आहे. पुनित राजकुमार यांचा अखेरचा चित्रपट युवारत्न हा होय. गतवर्षी हा चित्रपट रिलीज झाला होता

चार धाम यात्रा 2021: केदारनाथ धाम आणि यमुनेत्री यात्रा तात्पुरती बंद, जाणून घ्या काय आहे कारण


नवी दिल्ली : जर तुम्ही चार धाम यात्रा २०२१ ची योजना करत असाल तर सावध रहा, कारण प्रशासनाने केदारनाथ धाम आणि यमुनोत्रीची यात्रा बंद केली आहे. खरं तर, हवामान विभागाने रविवार, 17 ऑक्टोबरपासून दोन-तीन दिवस चारधामसह बहुतेक डोंगराळ भागात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.अशा स्थितीत खराब हवामान पाहता प्रशासनाने केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धामचा प्रवास तात्पुरता बंद केला आहे.

या धमांचा प्रवास तूर्तास थांबवण्यात आला आहे. चारधाम यात्रा मार्ग सध्या सुरळीत सुरू आहे. दुसरीकडे, रविवारी खराब हवामानामुळे केदारनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना प्रशासन आणि पोलिसांनी सोनप्रयाग येथे थांबवले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस प्रशासन आणि सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

खराब हवामान पाहता प्रशासनाने केदारनाथ यात्रा तात्पुरती बंद केली आहे. याचे कारण क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आहेत.असे सांगितले जात आहे की भाविक दर्शन घेतल्यानंतर परत न आल्यामुळे तिथेच थांबले आहेत, यामुळे धामावरील दबाव वाढत आहे.

बद्रीनाथ यात्रा चालू आहे

मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता, बद्रीनाथ धामला जाणाऱ्या यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

 

प्रवाशांना स्थानकातूनच परत करण्याचे आवाहन

हरिद्वारमधील हरकी पेडी रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर पोलीस सतत प्रवाशांना आंघोळ करून परत जाण्याचे आवाहन करत आहेत.

ऋषिकेशमध्येही यात्रेकरू आणि पर्यटकांना डोंगराळ भाग आणि गंगा घाटांना भेट देऊ नका असे आवाहन केले जात आहे.

नैनीताल, हरिद्वार, उत्तरकाशी आणि टिहरी जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने 18 ऑक्टोबरला सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एक दिवस सुट्टी जाहीर केली आहे

सिंघु सीमेवर हत्या: आरोपी सरबजीत सिंहला सात दिवसांची पोलीस कोठडी


नवी दिल्ली : शुक्रवारी सकाळी सिंघु सीमेवर अत्यंत निघृणपणे एका व्यक्तीची जमावाकडून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी निहंग शीख सरबजीत यानं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. यावेळी, न्यायालयानं आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शुक्रवारी सकाळी हात – पाय तोडलेल्या अवस्थेतील अवस्थेत एका व्यक्तीला रस्त्यावरच्या बॅरिकेडला बांधून ठेवल्याचं.समोर आलं होतं. रक्तबंबाळ आणि अर्धनग्न अवस्थेत या.व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. या व्यक्तीचं नाव लखबीर सिंह असल्याचं समोर आलं होतं. शीखांचा धर्मग्रंथ गुरुग्रंथ साहिबचा अपमान केल्याबद्दल त्याला शिक्षा देण्यात.आल्याचं निहंग शीख म्हणत असल्याचं एका व्हायरल व्हिडिओतून समोर आलं होतं. कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळाजवळच ही घटना घडलीय.

हत्येतील मुख्य आरोपी निहंग शीख सरबजीत सिंह स्वत:हून शुक्रवारी सायंकाळी उशिरा लखबीरच्या हत्येची जबाबदारी स्वीकारत पोलिसांसमोर हजर झाला होता. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. आज (शनिवारी) सोनीपत पोलिसांनी त्याला जिल्हा न्यायालयासमोर हजर केलं. यावेळी, न्यायालयानं त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

दसरा सणानिमित्त गोव्यात झेंडुची फुले घेवुन गेलेल्या शेतकऱ्यांची थेट फुले कचरा कुंडीत


महाराष्ट्रातुन गोवा फिरायला कोण गेले नसेल तर अपवादच,गोव्यात स्थानिक लोकांना रोजगार पाहिजे असा सुर काढत स्वताचा पक्ष काढत राजकारणाला सुरुवात करणाऱ्या मनोज परब नामक युवकाने महाराष्ट्र गोव्याच्या संबंधात विष पेरत दसरा सणानिमित्त झेंडुच्या फुलांची विक्रि करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना दादागिरी करीत विक्रिस आणलेला झेंडु थेट महापालिकेच्या कचरा गाडीत टाकला.पोरा-लेकरांच्या टोंडचा घास काढुन चार पैशाच्या आशेने गेलेल्या शेतकऱ्यांच्या मनाच्या वेदनेचा विचार करतानाहि अंगावर काटा येतोय.अन्नधान्याबाबतीत शंभर टक्के परराज्यावर अवलंबुन असलेल्या गोव्याने तरी असे वागणे योग्य नाही.महाराष्ट्रात गोव्यातील असंख्य बांधव महाराष्ट्रात पोठ भरतात उद्या हा संघर्ष पेटला तर….

६८ वर्षांनंतर Air India पुन्हा TATA कडे! कंपनीने सर्वात मोठी बोली लावून घेतला ताबा


नवी दिल्ली :तब्बल ६८ वर्षांनंतर सरकारी विमान कंपनी एअर इंडिया पुन्हा टाटा समुहाच्या ताब्यात गेली आहे. Air India साठी पॅनलनं टाटा समुहाची निवड केली आहे. टाटा सन्सने एअर इंडियाच्या निर्गुंवणुकीसाठी लावलेली बोली जिंकली आहे. आज अधिकृतपणे टाटांनी एअर इंडियासाठी लावलेली बोली जिंकल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. टाटा सन्सने एअर इंडियासाठी 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. तर दुसरे खरेदीदार असलेल्या अजय सिंह यांच्या स्पाईसजेटने एअर इंडियासाठी 15100 कोटी रुपयांची बोली लावली होती. या दोन्ही खरेदीदारांच्या बोली अंतिम फेरीसाठी पात्र असल्याचं एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी गठित करण्यात आलेल्या मंत्रिस्तरीय समितीने जाहीर केलं होतं.

भारताची राष्ट्रीय हवाई वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाची मालकी टाटा सन्सकडे आल्याची बातमी ब्लूमबर्गने गेल्या आठवड्यातच सूत्रांच्या हवाल्याने दिली होती मात्र तेव्हा अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतील डिपार्टमेंट ऑफ इनव्हेस्टमेंट आणि पब्लिक अॅसेट्सने याचा इन्कार केला होता.

कर्जाच्या खाईत बुडालेल्या एअर इंडियाच्या खाजगीकरणाची चर्चा खूप दिवसांपासून होती, आता टाटा सन्सकडे एअर इंडियाची मालकी येणार असल्याचं जाहीर झाल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. एअर इंडियावर आज घडीला तब्बल 60 हजार कोटींच्या कर्जाचा बोजा आहे. तब्बल 127 विमाने ताब्यात असलेल्या एअर इंडियाच्या 42 आंतरराष्ट्रीय सेवा आहेत.

आजच्या निर्गुंवणुकीने भारत सरकारने एअर इंडियामध्ये असलेला आपला सर्व हिस्सा टाटा सन्सला विकला आहे. टाटा सन्स ग्रुपकडे सध्या हवाई सेवेत असलेल्या विस्तारा या कंपनीची 51 टक्के तर एअर एशिया इंडिया या कंपनीची 84 टक्के हिस्सेदारी आहे. टाटा सन्स ग्रुपने एअर इंडियाची मालकी जिंकल्याचं आज जाहीर झालं असलं तरी संपूर्ण व्यवहार पूर्ण होऊन एअर इंडियाचं टाटा सन्सकडे हस्तांतरण पूर्ण होण्यासाठी डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे

टाटा सन्सचे अध्वर्यू असलेल्या जेआरडी यांनीच एअर इंडियाची स्थापना केली होती, हे इथे उल्लेखनीय आहे. जेआरडी टाटा म्हणजे जहांगीर रतनभॉय दादाभाई टाटा यांनी 1932 साली टाटा एअरलाईन्सची स्थापना केली होती. ते स्वतः देशातील पहिले परवानाधारक वैमानिक होते.  टाटा एअरलाईन्सची सुरुवात फक्त दोन लाख रुपयांच्या भांडवलावर झाली होती. टाटा एअर लाईन्सचा पहिला प्रवास हा कराची ते मुंबई असा होता.

एअर इंडियावर कर्ज

कर्जाच्या बोज्याखाली अडकलेल्या एअर इंडियाला विक्रीसाठी सुरू करण्यात आलेली बोली प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. तसंच यावेळी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे   यांनी यापूर्वी तारीख बदलली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. सरकारनं यापूर्वी २०१८ मध्ये एअर इंडियातील  ७६ टक्के हिस्सा विकण्याची तयारी केली होती. परंतु त्यावेळी सरकारला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. त्यानंतर सरकारनं कंपनीच्या पूर्णपणे विक्रीचा निर्णय घेतला.

अंतिम तारखेपर्यंत म्हणजेच १५ सप्टेंबरपर्यंत दोन संभाव्य खरेदीदारांनी आपल्या निविदा दाखल केल्या होत्या. टाटा समुहाद्वारे  आपली होल्डिंग कंपनी आणि स्पाईसजेटचे चेअरमन अजय सिंह आणि अन्य काही जणांनी आपली बोली सादर केली होती. सरकारनं एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया यापूर्वीच सुरू केली होती. परंतु कोरोना महासाथीमुळे यामध्ये विलंब होत गेला. एप्रिल २०२१ मध्ये सरकारनं पुन्हा एकदा बोली प्रक्रिया सुरू केली. तसंच १५ सप्टेंबर ही यासाठी अंतिम तारीख निश्चित करण्यात आली. २०२० मध्ये टाटा समुहानंदेखील एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी उत्सुक असल्याचं पत्र दिलं होतं.

2007 मध्ये इंडियन एअरलाईन्स या देशांतर्गत विमानवाहतूक करणाऱ्या कंपनीचा आणि एअर इंडिया आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक करणाऱ्या कंपनीत विलय झाल्यापासून एअर इंडियाचा तोटा सातत्याने वाढत असल्याचं जाणकार सांगतात.

देशावर वीजसंकट! आधीच कोळसा टंचाई, त्यात ऑक्टोबर हिट; नागरिकांनो वीज जपून वापरा नाहीतर…


मुंबई : सद्यस्थितीत देशभरात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी नागरिकांनी विजेचा वापर कमी आणि काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणाकडून करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत संपूर्ण देशात कोळशाच्या पुरवठ्यामध्ये तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे महावितरणने वीजपुरवठ्याचा करार केलेल्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाअभावी वीज निर्मितीमध्ये लक्षणीय घट सुरु आहे. याच दरम्यान वाढत्या तापमानामुळे विजेच्या मागणीत देखील वाढ होत आहे. विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार कृषिवाहिन्यांवर प्रतिदिन 8 तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे.

कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम झाल्याने विजेची मागणी सर्वाधिक असलेल्या सकाळ व संध्याकाळच्या कालावधीत नागरिकांनी विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा, विजेचा अनावश्यक वापर टाळावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.दरम्यान, या कालावधीत विजेचा वापर कमी झाल्यास मागणी व उपलब्धता यातील तफावत कमी होईल व भारनियमन करण्याची गरज भासणार नाही. नेहमीप्रमाणे सुरळीत वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

सद्यस्थितीत महावितरणच्या कार्यक्षेत्रात विजेची उच्चतम मागणी ही सुमारे १७ हजार ५०० ते १८ हजार मेगावॅट दरम्यान आहे. महावितरणने औष्णिक वीज निर्मिती केंद्रांसोबत सुमारे २१ हजार मेगावॅट वीजपुरवठ्याचा करार केला आहे. मात्र सद्यस्थितीत या करारातून जवळपास ११ हजार ४०० मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे विजेच्या मागणीची पुर्तता करण्यासाठी अपारंपरिक व इतर ऊर्जा स्त्रोतांकडून जवळपास ३ हजार मेगावॅट घेण्यात येत आहे सोबतच कोयना जलविद्युत निर्मिती प्रकल्पामधून १९०० मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येत आहे. तर उर्वरित १५०० ते २००० मेगावॅट विजेची तूट ही पॉवर एक्सचेंजमधून वीज खरेदीद्वारे भरून काढण्यात येत आहे.
देशभरातील कोळसा टंचाईमुळे पॉवर एक्सचेंजमधून देखील पुरेशी वीज उपलब्ध होत नसल्याची सध्या स्थिती आहे. परिणामी इतर राज्यांतील विजेच्या वाढत्या मागणीमुळे विजेचे सरासरी दर १२ ते १४ रुपये प्रतियुनिटपर्यंत गेले आहेत. विजेच्या कमाल मागणीच्या कालावधीत हे दर प्रतियुनिट २० रुपयांपर्यंत जात आहेत. तरीही महावितरणकडून मागणी व उपलब्धता यात ताळमेळ ठेवण्यासाठी या दराने आवश्यकतेप्रमाणे वीज खरेदी करून विजेचे भारनियमन टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु आहेत.
सकाळी व संध्याकाळी विजेची मागणी सर्वाधिक असल्याने अनावश्यक विजेचा वापर टाळावा. विजेचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.