राज्य

दोन डोस घेतले नसतील तर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार


येत्या ३० जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद

पुणे : जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी अशा सर्व आस्थापनांमध्ये कोविड लशीच्या दोन मात्रा न घेणाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये आणि ३० जानेवारी २०२२ पर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेवाव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार  यांनी दिले.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

विधान भवन येथे आयोजित पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते. बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे,  पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

 

पवार म्हणाले, ओमीक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोविड संसर्गाची स्थिती बिकट होत आहे. १०५ देश, भारतातील २३ राज्ये आणि राज्यातील ११ ठिकाणी ओमीक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. पुणे शहरात एकाच दिवसाचा पॉझिटीव्हीटी दर १८ टक्के आला आहे. या पार्श्वभूमीवर  ३० जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीचे वर्ग बंद राहतील, मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू राहील. १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत असल्याने नववी आणि दहावीचे वर्ग सुरू ठेवावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

दोन लसमात्रा नाही तर प्रवेश नाही

नव्या प्रकारच्या कोविड विषाणूचा धोका टाळण्यासाठी लसीकरण वाढविणे नितांत गरजेचे आहे. नागरिकांना लसीकरणासाठी प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात आले आहे. तरीदेखील बऱ्याच नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली नसल्याने जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय आणि खाजगी अशा सर्वच आस्थापनांमध्ये ‘दोन लसमात्रा नाही तर प्रवेश नाही’ या नियमाचे बंधन घालण्यात यावे. उपहारगृहे, मॉल्स, दुकाने, सिनेमागृहे, नाट्यगृहे तसेच इतर आस्थापना चालकांनी लशीच्या दोन मात्रेशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.

मुखपट्टी नसेल दर दंड निश्चित

कोविडपासून बचावासाठी मुखपट्टीचा (मास्क) उपयोग आवश्यक आहे. त्यामुळे मुखपट्टी न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्यात यावा. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने थुंकणाऱ्यांना १००० रुपये दंड आकारण्यात यावा आणि या निर्देशाचे कठोरतेने पालन करावे, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले. कोविड नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी थ्री प्लाय किंवा एन ९५ प्रकारच्या मुखपट्टीचा वापर करावा, अन्य प्रकारची मुखपट्टी (मास्क) सुरक्षित नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असल्याने त्याचा उपयोग टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.

‘ओमीक्रॉनच्या उपचार पद्धतीबाबत लवकरच निर्णय-आरोग्यमंत्री राजेश टोपे’

ओमीक्रॉनचा संसर्ग झाल्यास बाधित व्यक्तीचा विलगीकरण कालावधी आणि उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शक सूचना देण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात आली असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. संसर्ग वाढल्यास लागणारे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याविषयीदेखील केंद्र सरकारशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. कोविडचा संसर्ग वाढल्यास उपचारासाठी आवश्यक औषधांची उपलब्धता तातडीने करून देण्यात येईल. पात्र नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा त्वरीत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी श्री.राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. पुणे जिल्ह्याने लसीकरणाचा दीड कोटींचा टप्पा ओलांडला आहे. लशीच्या पहिल्या मात्रेचे १०४ टक्के आणि दुसऱ्या मात्रेचे ७४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ओमीक्रॉनचे ११३ रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, चेतन तुपे, सुनिल टिंगरे, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, यशदाचे महासंचालक एस.चोक्कलिंगम, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना अटक, 2 पिस्टल आणि 10 जिवंत काडतुसे जप्त


पुणे :  विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या दोन गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथक एकने अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे 2 पिस्टल आणि 10 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.त्याच्याकडून 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दत्तवाडी येथील लोखंडी पुलाजवळ मंगळवारी (दि.14) केली.

विशाल ज्ञानेश्वर रेणुसे (वय 26 रा. मोरया हेरिटेझ, 225 शुक्रवार पेठ, पुणे) आणि आकाश कुमार शेटे  (वय 22 रा. शुक्रवार पेठ, भदानेवाडा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पेट्रोलिंग करत असातना दोन तरुण दत्तवाडी येथील लोखंडी पुलाजवळील आनंदमठ येथे येणार असून त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती पथकला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता कंबरेला पाठिमागे दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि 10 जिवंत काडतुसे आढळून आली. आरोपींविरुद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदिप बुवा करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे , पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस अंमलदार नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, नितीन रावळ, विवेक जाधव, दुर्योधन गुरव, हनुमंत कांदे यांच्या पथकाने केली.

मित्राच्या बर्थडेसाठी निघालेल्या 22 वर्षीय तरुणाची गळा चिरुन हत्या, औरंगाबाद हादरले


औरंगाबाद : बुधवारपासून बेपत्ता असलेला २२ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थाची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या हिमायतबाग परिसरात समोर आली. कृष्णा शेषराव जाधव ( वय २२) असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो हडको परिसरातील टीव्ही सेंटर भागात सुभाषचंद्र बोस नगरमध्ये राहत होता.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार,कृष्णाच्या वडिलांचे टीव्ही सेंटर भागात बालाजी ऑप्टिकल नावाचे दुकान आहे. मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला दहा ते पंधरा मिनिटांसाठी जातो, असे सांगत कृष्णा बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास दुकानातून बाहेर पडला. त्यापूर्वी दुपारी कृष्णाचा मोबाईल हरवला होता. त्यामुळे तो बहिणीचा आयफोन घेऊन घराबाहेर पडला.मात्र, रात्र होऊन कृष्णा घरी पोहचला नसल्याने घरच्यांनी अनेकदा त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन लागत नव्हता, मित्रांकडे विचारपूस केल्यानंतरही काहीच माहिती मिळत नसल्याने कृष्णाच्या कुटुंबातील सदस्यांनी सिडको पोलीस ठाणे गाठत, बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

सिडको पोलीस कृष्णाचा शोध घेत असतानाच गुरुवारी सकाळी काही नागरिक हिमायतबाग परिसरात फिरात असताना रक्ताच्या थारोळ्यात भिंतीच्या कडेला असलेल्या खड्ड्यात तरुण निपचित पडलेला दिसला. नागरिकांना संशय आल्याने त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच, बेगमपुरा पोलिसांसह गुन्हेशाखेच्या पथकाने घटनस्थळी धाव घेतली. याचवेळी कृष्णाची बहीण आपल्या भावाच्या आयफोनच्या लोकेशन वरून भावाला शोधत-शोधत घटनास्थळी पोहचली. तर पोलीस पाहून तिने हंबरडा फोडला आणि त्यानंतर मृतदेह कृष्णाचा असल्याचं स्पष्ट झालं.

ज्या ठिकाणी हत्या झाली त्या ठिकाणच्या सुमारे ३० फूट अंतरापर्यंत रक्ताचे डाग, आणि झटापटीच्या खुणा पोलिसांना आढळून आल्या आहेत. घटनास्थळी दारूच्या बाटल्या आढळल्याने दारूच्या नशेत हे कृत्य झाले असावे असा देखील कयास लावण्यात येत आहे. तर बेगमपुरा पोलिसांनी कृष्णाच्या कॉल डिटेल्सवरून विचारपूससाठी तीन ते चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

दारू पिण्यास पैसे न दिल्याने मित्राचा लाकडाने ठेचून खून; एक गंभीर जखमी


पिंपरी चिंचवड : दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणावरून २७ वर्षीय तरुणाचा लाकडाने गंभीर मारहाण करून खून केल्याची घटना खरपुडी बुद्रुक (ता खेड ) येथे घडली आहे. तसेच या घटनेत एक गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला बोलताही येत नाहीये, त्याच्यावर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ८ तासात अटक केली आहे. ही घटना बुधवारी रात्री (दि १५ ) घडली.

रामदास सोपान थिटे  (वय २७ , रा. सडकवस्ती रेटवडी ता खेड ) असे खुन झालेल्या तरुणाचे नांव असून नितीन काळूराम काशिद (वय ४२ रा. खरपुडी ता खेड ) असे अटक करण्यात आलेल्या नांव आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बुधवारी रात्री मृत रामदास आणि दत्तात्रय आपल्या काही मित्रांसोबत कनेरसर ते खेड मार्गावरील खरपुडी बुद्रुक येथे हॉटेल माथेरान गारवा येथे गेले होते. याठिकाणी  ते दारू पिण्यास बसले होते. दरम्यान आरोपी नितीन काशिद हा दारूच्या नशेत पुन्हा दारू पिण्यास आला होता. मयत थिटे याच्याकडे दारू पिण्यास वीस रुपये मागत होता. पैसे न दिल्यामुळे आरोपी व मयत यांच्यामध्ये शिवीगाळ झाली. या वादानंतर हॉटेलबाहेर आलेल्या मित्रांनी रामदास आणि दत्तात्रय यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी आरोपी तरुणाने रामदास याच्या डोक्यात धारदार शस्त्राने हल्ला केला. हा हल्ला इतका भयावह होता, रामदास आणि दत्तात्रय दोघंही रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत कोसळले. दरम्यान काही स्थानिक नागरिकांनी रामदासचा चुलत भाऊ अतुल थिटे याला फोन करून या घटनेची माहिती दिली. अतुल आपल्या काही नातेवाईकांना याठिकाणी घेऊन आला असता, रामदास आणि दत्तात्रय रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडले होते.

त्यांच्या बाजूलाच त्यांची गाडी आणि फुटलेल्या काचा आढळल्या. यानंतर अतुल याने पोलिसांच्या मदतीने दोन्ही जखमी तरुणांना चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. पण याठिकाणी डॉक्टरांनी रामदास याला मृत घोषित केलं आहे. तर गंभीर जखमी झालेल्या दत्तात्रयवर याठिकाणी उपचार सुरू आहेत. मृत रामदासचा चुलत अतुल थिटे याच्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

घटनेनंतर आरोपी फरार होण्याच्या मार्गावर होता. पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संतोष घोलप, सचिन गिलबिले, मोहन अवघडे, स्वप्रील गाढवे, निखील गिरीगोसावी यांनी घटनास्थळी जाऊन तपासाची चक्रे फिरवित धागेदोरे शोधत आरोपी काशिद याला ताब्यात घेतले. काशिद याने गुन्हयांची कबुली दिली असुन अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक सतीश गुरव करित आहे

मोठी बातमी! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर


मुंबई : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालये ऑक्टोबर २०२१ पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू झाली आहेत. त्याअनुषंगाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी ३१ मार्च ते ९ एप्रिल २०२२ असा असेल. प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ३१ मार्च ते २१ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जून २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.

इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/ अंतर्गत गुणांच्या परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ५ एप्रिल ते २५ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता दहावीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा ५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जुलै २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.

परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ संदर्भात केंद्र व राज्य शासनाने तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे.

बळीराजाचे सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले; चिवट लढा देणाऱ्या पशूप्रेमींचे अभिनंदन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*


मुंबई : बैलगाडा शर्यंतीवरील बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आपल्या पशूधनाची जीवापाड सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणजेच बळीराजाचे आपल्या सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपली संस्कृती आणि परंपरा टीकवून ठेवणाऱ्या या शर्यंतीसाठी अखेरपर्यंत चिवटपणे लढा देणाऱ्या पशूप्रेमींचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

मुख्यमंत्री या संदेशात म्हणतात, बैलगाडा शर्यत ही पशूपालक आणि पशूधनावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बळीराजाची पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. आपल्या संस्कृतीत पशूधनालाही दैवताचे स्थान आहे. यातून पशूधनाचे जतन, संवर्धनाचाही विचार केला गेला आहे. शर्यंतीमधून या सगळ्या बाबींना प्रोत्साहन मिळत असे. शर्यंती सुरू व्हाव्यात यासाठी दीर्घ असा आणि चिवटपणे लढा द्यावा लागला. त्यामागेही बळीराजाचे आपल्या पशूधनावरील प्रेमाचे बळच होते. शर्यती, असोत किंवा नसोत, आपले पशूपालक या पशूधनाची पोटच्या लेकरांप्रमाणे काळजी घेतात, हे सर्वांनाच माहित होते. आता शर्यती सुरु होतील, त्यामधून आपल्या लोकपरंपरेचे आणि पशूधनाचे वैभवही सगळ्यांना पाहता येईल.

शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, पण त्यामध्ये गैर प्रकार आणि पशूधनाचा कदापीही छळ होऊ नये. त्याबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यानी केले आहे.

बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवण्याचा निर्णय शेतकरी हिताचा, पशुधनाचं संवर्धन करणारा – उपमुख्यमंत्री अजित पवार


मुंबई :- “राज्यातील बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले असून हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा, पशुधनाचं संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल. या निर्णयानं बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली आहे. हा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. या लढाईत आदरणीय शरद पवार साहेबांनी लक्ष घातलं. मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासारख्या नेत्यांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही लढाई ध्येयनिष्ठेनं, संपूर्ण ताकदीनं लढली. या लढाईत सहभागी सर्व नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. आभार मानतो. महाविकास आघाडी सरकारनं सर्वशक्तिनिशी या न्यायालयीन लढाईला बळ दिलं. त्यातून मिळालेलं हे यश राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला आनंद व्यक्त केला.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

बैलगाडा शर्यती आता राज्यात पुन्हा सुरु होतील. मात्र शेतकऱ्यांनी सर्व अटी, नियमांचं पालन करण्याचं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं बंदी उठवण्यासंदर्भात आज दिलेल्या निर्णयावर पुन्हा घटनापीठ विचार करणार असलं तरी, तिथेही शेतकऱ्यांचाच विजय होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

पॉस्को प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता


 

पुणे : पॉस्को प्रकरणातील आरोपी मोहन तुकाराम कांबळे (रा.कांबळे वस्ती चाकण) याची खेड जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.कांबळे हा तीन वर्षे येरवडा येथे कारागृहात होता.सरकार पक्षाने कोणतेही सबळ पुरावे सादर न केल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.आरोपीच्या वतीने वकील नितीन कदम.अर्चना गायकवाड.प्रशांत कुडचे.अक्षय म्हस्के.सुप्रिया.कमलेश लोखंडे.श्रध्दा जैन.यांनी कामकाज पहिले.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

 

मोठी बातमी! राज्यात बैलगाडा शर्यतीला 7 वर्षांनंतर मिळाली सशर्त परवानगी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय


नवी दिल्ली :   गेल्या 7 वर्षापासून महाराष्ट्रभर चर्चेच असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील  बंदीविषयी गुरुवारी (दि.16) सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते.या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद काल पूर्ण झाला होता. आज सुनावणीच्या सुरुवातीला मुकुल रोहतगी यांचा राज्य शासनाकडून युक्तिवाद केला.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद काल पूर्ण झाला होता. आज सुनावणीच्या सुरुवातीला मुकुल रोहतगी यांचा राज्य शासनाकडून युक्तिवाद केला.

घोडा-बैलांवरील अत्याचार थांबावेत म्हणून एकाच गाडीला घोडा-बैल जुंपण्यास बंदी होती. शर्यतीत बैलांना चाबकानं, मोठ्या काठीनं अमानुष मारणं, बॅटरीचा शॉक देणं, टोकदार खिळे लावणं, अशा अनेक प्रकारे अत्याचार केले जातात, असे सांगत प्राणीमित्रांनी शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने प्राण्यांवर कोणतेही अत्याचार होणार नाहीत, या अटीवर बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे.

सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले, सुप्रीम कोर्टाचा मी आभार मानतो. बैलगाडा प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे.
महाविकास आघाडीने जोर लावण्याने हा निर्णय आला आहे.
दिलीप वळसे पाटील, सुनील केदार, बंटी पाटील या सर्वांना मी धन्यवाद देतो. सर्व बैलगाडा मालकांचे अभिनंदन करतो. हा ग्रामीण भागातील लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता. तसेच महाराष्ट्र सरकारने जी नियमावली तयार केली आहे त्यानुसार यापुढे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, बैलगाडा शर्यतीवर असलेल्या बंदीमुळे शेतकरी नाराज झाले होते ही बंदी उठवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. अखेर आज बैलगाडा शर्यतीला परवानी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे निश्चितच सर्वांना आनंद झाला आहे. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की, ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने सशर्त परवनागी दिली आहे त्यानुसार सर्वांनी नियमांचे पालन करुनच शर्यतीचं आयोजन करावं.

रुपाली पाटील ठोंबरे यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश


मुंबई : मनसेच्या अंतर्गत गटबाजीला वैतागून रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यातच रुपाली पाटील यांनी पक्षाला धक्का दिला. त्यानंतर आता रुपाली पाटील ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी विविध पक्षाच्या नेत्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

“रुपाली ताईंना माननारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे लोक त्यांना मानतात. त्यांच्यामुळे पुणे शहर पुढे जाईल, महिलांचा विकास होईल,” असं अजित पवार यावेळी म्हणाले. रुपाली ठोंबरे आणि इतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं अजित पवारांनी राष्ट्रवादीत स्वागत केलं.

मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यासोबत मनसेच्या लावण्या शिंदे, वंदना साळवी, मनिषा सरोदे, मनिषा कावेडिया, प्राजक्ता पाटील, प्रिया सूर्यवंशी पाटील, अभयसिंह मांढरे, अजय दराडे यांनी रुपाली पाटील यांच्यासह मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, मी मनसेचा राजीनामा देत शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला त्याबद्दल मी आभारी आहे. अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. पालकमंत्री अजित पवारांची भेट घेतल्यानंतर सतत त्यावर पक्षात आक्षेप घेतला जात होता. पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी कधीही पक्षीय भेदभाव केला नाही. मात्र माझ्याच पक्षातील अनेकांना ते खटकत होते. मी ज्या पद्धतीने लोकांच्या समस्या सोडवत होते तसेच यापुढे मी काम करणार आहे. यापुढे पुणे शहरात भव्य मेळावा घेऊन त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेला दिसेल असा दावा त्यांनी केला.

 

प्रवेश करण्यापूर्वी रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट करुन प्रवेशाचे संकेत दिले होते. “आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत; हो म्हणूनच ठरलंय! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार…”, असं ट्विट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलं होते.

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पण मनसेच्या पुण्यातील नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपण मनसे सोडत असल्याचं रुपाली पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. पण आपण कोणत्या पक्षात प्रवेश करु हे त्यांनी उघड केलं नव्हतं. पण आज त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

कोण आहेत रुपाली पाटील ठोंबरे?

रूपाली पाटील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. तसेच मनसेच्या महिला विभागाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली होती. अलीकडेच त्यांची शहराध्यक्ष पदावरुन उचलबांगडी करत राज्य उपाध्यक्ष पद दिले होते. मंगळवारी त्यांनी आपला राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर केला होता.

पोलिस नाईक खुशाल प्रदीप वाळुंजकर यांचा राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान सत्कार


 

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र राज्य पुणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुन्हेगारांचे वर्णनावरून रेखा चित्र काढण्यासाठी सुरू केलेल्या ५५ दिवसाचे रेखाचित्र राज्यस्तरीय प्रशिक्षणा दरम्यान प्रथम क्रमांकाचे गुण प्राप्त झाल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्या हस्ते पोलिस नाईक खुशाल प्रदीप वाळुंजकर यांचा प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान सत्कार करण्यात आला.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

या रेखाचित्र प्रशिक्षणाचा फायदा हा पोलीस दलाला होणार असून यामध्ये गुन्हेगारांचे वर्णनावरून रेखाचित्र काढणे, गुन्हा करून पसार झालेला गुन्हेगार व बेवारस मयताची ओळख पटविणे आणि करोडो लोकांमधुन त्याला शोधुन काढणे, तसेच सीसीटिव्ही फुटेज मधील अस्पष्ट दिसणारी व्यक्तीचे रेखाचित्र रेखाटन करणे, तसेच नदी नाल्यातील अनोळखी बॉडीचे रेखाचित्र तयार करणे तसेच जळालेल्या अवस्थेतील मृत व्यक्तीचा चेहरा समजुन येण्यासाठी त्याचे रेखाचित्र तयार करणे अशा विविध प्रकारच्या घटकांमध्ये या रा.गु.वि. महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सुरू केलेल्या रेखाचित्र विभाग प्रशिक्षणाचा फायदा पोलीस दलाला होणार आहे.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग रितेश कुमार, अप्पर पोलिस महासंचालक कारागृह व सुधार सेवा अतुलचंद्र कुलकर्णी , विशेष पोलीस महासंचालक मकरंद रानडे, संभाजी कदम पोलीस अधीक्षक, गु. अ. वी. व डॉक्टर महादेव सगळे, सहकार्यवाह भारती विद्यापीठ अभीमित विश्वविद्यालय तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रोफेसर अविनाश कुंभार, एच डी रसायनशास्त्र विभाग गिरीष चरवड रेखाचित्र मुख्यप्रशिक्षक,  सतिश धर्माधिकारी प्रशिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुकतालयातील पोलीस अंमलदार खुशाल वाळुंजकर, सतीश भालेराव, राजकुमार ईधारे, श्रीमती अनिता यादव, श्रीमती देवकी भोसले, अभिमन्यू बनसोडे, श्रीमती उशा होले पिंपरी चिंचवड पोलीस सहभागी होते तर गुन्हे अन्वेषण विभागाकडून अंकुश लातूरकर,श्रीमती राखी खवले,श्रीमती योगिता जाधव श्रीमती शर्मिला साळुंखे,पुणे शहर पोलिस आयुक्तालय कडून महेश कुल्लाळ ,श्रीमती प्रीती शिंदे सहभागी पोलीस अंमलदार यांचा प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान सत्कार करण्यात आला.

या दरम्यान कार्यक्रमाचे वेळी  अविनाश कुंभार यांनी उपस्थितांचे स्वागत केले, व कार्यक्रमाचे प्रस्तावित श्रीमती अनुजा देशमाने अप्पर पो. अधिक्षक गु.अ.वि. यांनी केले व कार्यक्रमाचे आभार श्री संभाजी कदम पो. अधिक्षक रा.गु.वि. यांनी केले

पिंपळे सौदागर परिसरात घरगुती गॅसची चोरी करणारी टोळी गजाआड ; ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल


 

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड परिसरात घरगुती वापराच्या सिलिंडरमधून गॅस चोरी होत असल्याचे उघडकीस आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून जागा मालकासह एकूण नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत 6 जणांना अटक केली आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथे मंगळवारी (दि. 14) सकाळी उघडकीस आली.
बालाजी मलप्पा वाघे (वय 31, रा. समर्थ कॉलनी, रहाटणी, धनराज मलप्पा वाघे (वय 28, रा. सुयोग कॉलनी, रहाटणी), सुरेश राजकुमार म्हेत्रे (वय 25, रा. रहाटणी), (एमएच 14 एएस 5720) या गाडीचा चालक काकासाहेब साहेबराव मिसाळ (वय 49, रा. वेताळनगर, चिंचवड), (एमएच 14 एझेड 6064) या गाडीचा चालक अतिष अंबादास कसबे (वय 28, रा. रहाटणी चौक, रहाटणी), शुभम रघुनाथ गवळी (वय 27, रा. पवनानगर, रहाटणी), वंदना गॅस एजन्सीचा चालक-मालक, गुरुप्रसाद इंण्डेन गॅस एजन्सी (औंध) याचा चालक-मालक आणि जागेचा मालक कोकणे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकातील महिला पोलीस नाईक वैष्णवी विजय गावडे (वय 35) यांनी मंगळवारी (दि. 14) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर 2021 रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास कोकणे चौक, पिंपळे सौदागर येथील आदित्य गॅस दुकानाच्या पाठीमागील बाजूस पत्र्याच्या खोलीत गॅस चोरी करताना मिळून आले. आरोपींनी आपसांत संगनमत करून सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता घरगुती गॅस सिलिंडरमधून काही गॅस काढून घेताना मिळून आले. तसेच इतर आरोपींनी त्यांना या कामात अप्रत्यक्षरित्या मदत केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

दुग्धव्यावसायिकाला खंडणी मागणाऱ्या विष्णु जाधव टोळीतील दोघे जेरबंद


पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत दुग्धव्यवसाय करणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या दोन भावांना दोन लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला होता. आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी विष्णु जाधव टोळीतील दोघांना लोणीकाळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे. हि घटना 4 डिसेंबर ते 11 डिसेंबर या दरम्यान घडली आहे

राजेंद्र उर्फ राजु विजय गायकवाड (रा. शिंदावणे ता. हवेली जि. पुणे), घनश्याम उर्फ गणेश आत्माराम शिंदे (रा. कुंजीरवाडी ता. हवेली, जि. पुणे) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी अण्णासाहेब तानाजी खलसे  (रा. कुंजीरवाडी ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील कुंजीरवाडी (ता. हवेली जि.पुणे) येथील रहीवासी असुन त्यांचा दुग्ध व्यवसाय आहे. फिर्यादी व त्यांच्या भाऊ यांना आरोपी राजू उर्फ राजेंद्र गायकवाड याने त्याच्या मोबाईलवरुन अण्णासाहेब खलसे यांना फोन करुन मोक्यातील आरोपी विष्णु जाधव याचे नंबरकारी असल्याचे सांगून खलसे यांना जीवे मारण्याची धमकी देऊन दोन लाख रुपये खंडणी मागितली. त्यावेळी फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला. मात्र तो वारंवार फोन करुन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पैशाची मागणी करत होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन आरोपींना बेड्या ठोकल्या.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे,अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, संभाजी देविकर, बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे यांच्या पथकाने केली.

राज्य सरकारला मोठा झटका, ओबीसी आरक्षणासंदर्भात याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली ; इम्पिरिकल डेटाची मागणीही फेटाळली!


नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आरक्षण लागू करण्यापूर्वी तिहेरी चाचणी करणे अनिवार्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. इम्पेरिकल डेटा देऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने राज्य सरकारला मोठा धक्का  बसला आहे.  ओबीसी आरक्षणाबाबत आज (१५ डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयात सकाळी ११ वाजता सुनावणी पार पडली आहे.

केंद्राने महाराष्ट्र सरकारला इम्पेरीकल डाटा पुरवावा किंवा मग राज्य सरकारला डाटा गोळा करण्यासाठी वेळ द्यावा आणि तोपर्यंत सगळ्या निवडणूका पुढे ढकला, अशी मागणी याचिकेत केली आहे. यावर निवडणुकांसंदर्भात काल (१४ डिसेंबर) सुनावणीत युक्तिवाद झाला होता.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

म्हणून इम्पिरिकल डेटा मागणीची राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

२०११ च्या जनगणनेतून तयार झालेला सामाजिक-आर्थिक मागासलेपणाचा तपशील Empirical Data सार्वजनिक होणार नाही, म्हणजेच राज्य सरकारला मिळणार नाही. जातीनिहाय जणगणना ओबीसींची लोकसंख्या मोजण्यासाठी झालेली नव्हती तर देशातील मागासलेपणाची स्थिती समजण्यासाठी झाली होती. तसंच त्यात अनेक त्रुटी. त्यामुळे हा डेटा नव्याने आरक्षणाचे निकष ठरवण्यासाठी वापरले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात इंपिरिकल डेटा देण्याचे निर्देश देण्यासाठी दाखल केलेली याचिका आज फेटाळण्यात आली आहे.

ओबीसी जागांवर होणाऱ्या निवडणुका स्थगित

निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि १०५ नगरपंचायतीच्या समित्यामध्ये होणाऱ्या निवडणुकातील ओबीसी जागांवर होणाऱ्या निवडणुका स्थगित झाल्या आहेत.  तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेतील ओबीसी जागांना स्थगिती झाल्या आहेत. आता राज्यातील पंचायत समितीच्या ४५ ओबीसी जागांना स्थगित झाल्या आहेत. तर येत्या २१ डिसेंबरला यासाठी मतदान होणार आहे. फेब्रुवारीमध्ये २३ महापालिका, २५ जिल्हा परिषदा, २९९ पंचायत समित्या, २८५ नगर परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून तुर्तास स्थगिती

राज्यातील  स्थानिक निवडणुकीत ओबीसीना २७ टक्के आरक्षण देता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे न्यायालायने तुर्तास तरी ओबीसी आरक्षण स्थगिती  दिली आहे. राज्यचा आध्यादेश ग्राह्य धरला येणार नाही, असेही न्यायालयाने नमुद केले आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे आता राज्यातील आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायत निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय मानला जातो. न्यायालयाने ओबीसीच्या आरक्षणाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली.

पुण्यातील पहिली ते सातवीच्या शाळा १६ डिसेंबरपासून सुरू होणार


पुणे –: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल पावणे दोन वर्ष बंद असलेल्या पुणे महापालिका हद्दीतील पहिली ते सातवीचे वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकांनी याची नोंद घ्याव. असे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.

शाळा सुरु करण्यासंदर्भात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार , महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार  विभागीय आयुक्त सौरभ राव  यांच्या बैठक झाली. या बैठकीत पुण्यातील शाळा 16 डिसेंबरपासून सुरु  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

या संदर्भात माहिती देताना महापौर मुरलीधर मोहळ म्हणाले, “पुणे शहरातील सर्व शाळा या १६ डिसेंबरपासून आपण सुरू करत आहोत. पहिली ते सातवी इयत्तेचे वर्ग हे १६ डिसेंबर रोजी सुरू होत आहेत. देण्यात आलेल्या काही गाईडलाईन्स, मार्गदर्शक सुचने प्रमाणे शाळा सुरु करण्यात येणार आहेत. शाळा सुरु करत असताना शाळांचे निर्जंतुकीकरण करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणं याबाबतच्या संबंधितांना सूचना दिल्या असून 16 डिसेंबर पासून पुण्यातील 1 ली ते 7 वीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत.

 

तसेच, “यामुळे पुण्यातील शाळा कधी सुरू होणार? हा मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला विषय आता मार्गी लागलेला आहे. गुरूवारपासून महापालिकेच्या हद्दीतील सर्व शाळा सुरू होत आहेत.” असं महापौर मोहळ यांनी सांगितलं.

राज्य शासनाकडून करोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आल्यानंतर टप्प्या टप्प्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 4 ऑक्‍टोबरपासून शहरी भागातील आठवी ते बारावी व ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 1 डिसेंबरपासून शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवी व ग्रामीण भागातील पहिली ते चौथीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. त्याबाबत मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या होत्या.