व्हिडिओ

पुण्यातील महिला डीसीपीचा फुकटेपणा उघड, ऑडिओ क्लिप होतेय प्रचंड व्हायरल


पुणे : पुणे हे असं शहर आहे, जे तिथल्या हटके नियमांमुळे नेहमीच चर्चेत असतं. म्हणूनच पुणे तिथे काय उणे, असं म्हटले जाते. सध्या सोशल मीडियावर एका महिला पोलीस अधिकाऱ्याचं फोनवरील संभाषण चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे. पुण्यातील डीसीपी मॅडमला एसपी हॉटेलची बिर्याणी हवी आहे, तीही मोफत! डीसीपी मॅडमला फुकट बिर्याणी हवी असल्याचा ऑडिओ आणि त्यांची ही फर्माईश सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतेय. डीसीपी मॅडमच्या या प्रकाराला कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्र देखील लिहिल्याचं कळतंय. दरम्यान, आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीत.

 

अशी आहे व्हायरल होणारी ऑडिओ क्लिप

साधारण ५ मिनिटांची ही ऑडिओ क्लिप आहे. यामध्ये डीसीपी मॅडम मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगतात. त्यांना हे सगळं एका चांगल्या हॉटेलमधून हवं आहे. हे पदार्थ जास्त तेलकट, तिखटही नको आहेत. त्याचबरोबर त्याची चव चांगली असावी असाही त्यांचा आग्रह आहे. या डीसीपी मॅडम फक्त ऑर्डर देऊन थांबत नाहीत. तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही विचारलाय. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचे सांगतोय. अशावेळी मॅडम त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी खडसावत असल्याचं या ऑडिओ क्लिपमधून समोर आलं आहे.

 

कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांचं पोलीस महासंचालकांना पत्र

असेही समोर आले की, समाजकल्याण आयुक्त पदावर असलेल्या मॅडमच्या पतीला मटण बिर्याणी आवडते तर त्यांना चिकन बिर्याणी. फोनवर ऑर्डर देताना त्या हॉटेल चालकाने पैसे मागितल्यास हद्दीतील पोलीस निरीक्षकाकडे तक्रार करा, असेही त्या आपल्या कर्मचाऱ्याला सांगायला विसरत नाहीत. डीसीपी मॅडमच्या या कारभाराला कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. भ्रष्टाचार वाढवणाऱ्या या अधिकारी महिलेची खाबुगिरी रोखण्याची आणि चौकशी करण्याची मागणी आता केली जात आहे.

Video- घाटकोपरमध्ये खड्डा पडला आणि कार बुडाली, जाणून घ्या काय आहे ‘त्या’ व्हायरल व्हिडीओ मागचे सत्य


मुंबई : पहिल्याच पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे छोट्यामोठ्या दुर्घटना घडल्या आहे. अशातच घाटकोपरमध्ये एका सोसायटीमध्ये पार्किंगमध्ये अचानक खड्डा पडला आणि कार पाण्यात बुडाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून भाजपकडून मुंबई महापालिकेला लक्ष्य करण्यात येत आहे. या अनुषंगाने महापालिकेने स्पष्टीकरण दिले असून या घटनेशी महापालिकेचा दुरान्वयेही संबंध नसल्याचे नमूद केले आहे. घाटकोपर भागातील या घटनेबाबतची वस्तुस्थितीही पालिकेकडून मांडण्यात आली आहे

कारच्या या घटनेशी महापालिकेचा दूरान्वयानेही  संबंध नाही. ही घाटकोपर भागातील खासगी सोसायटीतील घटना आहे. घाटकोपर पश्चिम परिसरातील एका खासगी सोसायटीच्या परिसरात उभी असलेली एक कार पाण्यात बुडत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे कळविण्यात आले आहे की, सदर व्हिडिओतील घटना 13 जून 2021 रोजी सकाळी घाटकोपर पश्चिम परिसरात घडलेली आहे.

https://youtube.com/shorts/6CqDyArTd4w?feature=share

सदर सोसायटीच्या आवारात एक विहिर आहे. या विहिरीच्या अर्ध्या भागावर ‘आरसीसी’ करून ती विहीर झाकण्यात आली होती. त्या ‘आरसीसी’ केलेल्या भागावर सोसायटीतील रहिवाशी ‘कार पार्क’ करीत असत. हाच ‘आरसीसी’ चा भाग खचून त्यावर ‘पार्क’ केलेली एक कार पाण्यात बुडाली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. सदर कारमध्ये कोणीही नसल्याने घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही, तसेच कोणीही जखमी झालेले नाही.

या दुर्घटनेनंतर महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाद्वारे पाणी उपसण्याच्या कामाचे समन्वयन करण्यात येत आहे. तसेच सदर ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाय योजना तातडीने करण्यास संबंधित सोसायटीला सूचित करण्यात आले आहे. घाटकोपर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी देखील सदर घटनास्थळी हजर आहेत, असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे या सोसायटीतील विहिरीची पाणी पातळी वाढली होती. त्यामुळे जमीन पोकळ झाली आणि आरसीसीचे छत कारच्या वजनाने कोसळले असावे, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

हृदयद्रावक VIDEO, जीवनाच्या परीक्षेत अधिक काळ टिकू शकत नाही म्हणत महाविद्यालयीन तरुणीने केली आत्महत्या


लातूर : लातूरच्या एका खाजगी महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीने एका व्हिडीओ शेअर करत आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.सोशल मीडिया वरती शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी जीवनाच्या परीक्षेत अधिक काळ टिकू शकत नाही, असं म्हणत तिने व्हिडीओ शेअर केला आहे.आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. पोलीस तपास करत आहेत.

आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव सोनू शेख असं असून तिच्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ती लातूरमधील एका खाजगी महाविद्यालयात बी ए च्या द्वितीय वर्षाला शिकत होती. मृत सोनू शिक्षण घेत असतानाच पार्ट टाइम जॉब देखील करत होती. आता हे सगळं आता मला सहन होतं नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असंही सोनूनं व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

“जीवनाच्या परीक्षेत मी आणखी जास्त काळ टिकू शकत नाही. माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नये… मला जे कोणी जवळचे मानायचे त्यांना माझी एवढीच विनंती आहे, की त्यांनी अधून मधून माझ्या आईकडे जाऊन तिची विचारपूस करावी… कारण मी गेल्यानंतर माझ्या आईचं जगणं खूप मुश्किल होऊन बसेल” असं सोनू आपल्या व्हिडीओमध्ये म्हणत आहे.

सोनूच्या आईला कोणीतरी फोनवर बोलत होतं, यामुळे त्यांच्यात भांडणही झालं होतं. यातूनच सोनुने टोकाचा निर्णय घेतला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी लातूरच्या विवेकानंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सुसाईड नोटचा शोध घेतला जात आहे. सोबतचं मोबाईलमध्ये आणखी काही आहे का? याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे. सोनूने आत्महत्या केली त्यावेळी घरात कोणीच नव्हतं. तिची आई कामावर गेली होती, तर वडील विभक्त राहत असल्याने तेही घरात नव्हते.

बांधकाम व्यावसायिकाच्या घरच्यांना ओलीस ठेवत 50 लाखांच्या खंडणीची मागणी, नागपूर पोलिसांनी अशी केली सिनेस्टाईल सुटका


नागपूर :  नागपुरात एक दरोडेखोर भर दिवसा दुपारी अडीचच्या सुमारास बंदूक आणि चाकू घेऊन एका बांधकाम व्यवसायिकाच्या घरात शिरला. त्यांनी घरातील नागरिकांना जीवे मारण्याची धमकी देऊन ५० लाखांची खंडणी मागितली. पण पोलिसांनी अत्यंत चपळपणे सिनेस्टाईल या दरोडेखोरांनाा घातक शस्त्रासह मोठया अटक केली आहे.जितेंद्र तुळशीराम भिसेन (वय १९ वर्षे रा. हुडकेश्वर खुर्द, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

संबंधित घटना ही नागपूरच्या पिपळा फाटा परिसरात घडली आहे. या परिसरातील बांधकाम व्यावसायिक राजू वैद्य यांच्या घरात एक दरोडखोर घुसला. त्याने राजू वैद्य यांच्या कुटुंबियांना ओलील धरलं होतं. पोलिसांनी या आरोपीला मोठ्या शिताफीने आणि सिनेस्टाईल पद्धतीने आरोपीला अटक केली. हा थरार नेमका कसा घडला, याबाबतची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

https://youtube.com/shorts/xZKIGfYtgYM?feature=share

 

राजू वैद्य हे बांधकाम व्यावसायिक आहेत. काल (दि.४) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास आरोपी बंदूक आणि चाकू घेऊन घरात शिरला. त्याने घरातील वैद्य कुटुंबियांना ओलीस ठेवले आणि 50 लाख रुपयांची खंडणी मागितली.दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्हेशाखा, युनिट कमांक ०४, नागपूर शहर पथक वरीष्ठांचे आदेशाने तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळी राजू वैद्य याचे घरासमोर पो.स्टे हुडकेश्वर येथील पोलीस स्टाफ व वरीष्ठ अधिकारी हजर होते. नागपूर शहराचे  पोलीस उपायुक्त, गुन्हेशाखा (डिटेक्शन)  गजानन राजमाने हे सुध्दा त्वरीत घटनास्थळावर हजर आले.

पोलीस उपायुक्त(डिटेक्शन), गुन्हेशाखा, नागपूर शहर यांनी घटनास्थळाचे अवलोकन केले तसेच पोलीस निरीक्षक भोसले, पोस्टे हुडकेश्वर, सपोनि स्वप्नील भुजबळ, यांचेकडून घरामध्ये
बंदी असलेले व्यक्ती तसेच आरोपी व त्याचेकडे असलेले हत्यारा संबंधाने व त्याचे मागणी संबंधाने माहीती घेतली. डॉ. अक्षय शिंदे, पोलीस उपायुक्त, परीमंडळ कमांक ०४, नागपूर शहर तसेच डॉ. निलेश पालवे, सहायक पोलीस आयुक्त, सक्करदरा विभाग, नागपूर शहर हे सुध्दा घटनास्थळी हजर होते व घटनेची माहीती घेवून मार्गदर्शन करीत होते.

पोलीस निरीक्षक भोसले यांनी वेठीस धरलेले आरोपी ५० लाखाची
खंडणी मागत असून आरोपी बददल माहती मिळविणेकरीता व आतील परीस्थीती जाणून घेण्यासाठी २ लाख २ वेळा या प्रमाणे रू. ४ लाख दिल्याचे सांगीतले. तसेच तळ माळयावर दोनमहीला व एक मुलगी बेठीस धरली असून पहिल्या माळयावर एक महीला व दोन मुले वेठीस धरण्यात आली आहे असे हजर असलेले वरीष्ठ अधिकारी यांना सांगीतले. तीन महीला व मुलीस दक्षीणमुखी मुख्य दरवाजा असलेल्या हॉलमध्ये वेठीस धरून मुख्य दरवाजाचे बाजूस असलेले पुर्वकडील खिडकीतून पैसे घेत असून तेथे असलेले मुलीचे गळयावर चाकू लावत असल्याचे सांगीतले.

परीसरात लागलेले कॅमेऱ्यातून बाहेरील परीस्थीतीवर लक्ष ठेवून आहे असे सांगीतले. त्यानूसार  डॉ. अक्षय शिंदे, पोलीस उपायुक्त, परीमंडळ कमांक ०४, नागपूर शहर तसेच डॉ.निलेश पालवे, सहायक पोलीस आयुक्त, सक्करदरा विभाग, नागपूर शहर यांचेसोबत गजानन राजमाने, गुन्हेशाखा, नागपूर यांनी चर्चा करून पोनि भोसले याना मार्गदर्शन करून पोस्टे हुडकेश्वर येथील कर्मचारी तसेच साध्या कपड्यातील कर्मचारी व गुन्हेशाखा येथील पथकांनी घटनास्थळाला घेराव टाकला. तसेच योजना करून राजु वैद्य याचे घराचे आत असलेल्या आरोपीस परत २ लाख रूपये देवून आतील आरोपीस गाफील करून ताब्यात घेण्याचे ठरविले. परंतू आरोपीगाफील न होता त्याने २ लाख रुपये स्वीकारले.

त्यानंतर अंगणातील पश्चीमेकडील मुख्य गेट समोरील कॅमेरा निकामी केला व पोउपआयुक्त  गजानन राजमाने यांचे नेतृत्व व मार्गदर्शनात सपोनि ओमप्रकाश सोनटक्के, गुन्हेशाखा नागपूर सपोनि स्वप्नील भुजबळ, पोस्टे हुडकेश्वर, सपोनि सत्यवान कदम पोस्टे हुडकेश्वर, पोहवा बबन राउत, गुन्हेशाखा, नापोशी प्रशांत कोडापे गुन्हेशाखा पोस्टे हुडकेश्वर.येथील पोहवा शैलेष ठवरे, नापोशी अश्वीन बडगे, नापोशी आशिष तितरमारे, पोशी प्रदिप बदाडे,
पोहवा मनोज नेवारे, नापोशी ललीत तितरमारे, नापोशी चंद्रशेखर भारती असे अंगणात शिरून घराचे पश्चीमेस असलेले मागील भागात प्रवेश केला. घराचे पश्चीमेकडील मागील बाजूस असलेला संडासाजवळील कॅमेरा निकामी केला. तसेच वरील माळयावर असलेले महीला हर्षल राजू वैदय (वय ३७ वर्षे) या मागील गॅलरीत आल्या असता संडासावर चढून त्यांचेकडून आतील परीस्थीतीची माहीती घेण्यात आली. आणि आतील आरोपीस कोणत्याही प्रकारचा सुगावा लागू न देता व योजना आखून पहील्या माळयावर असलेल्या हर्षल राजू वैद्य (वय ३७ वर्षे), चिउ बंडुजी वैद्य (वय २० वर्षे), विहान राजू वैद्य (वय ६ वर्षे रा. सर्व प्लॉट कमांक ०१, पिपळा फाटा हुडकेश्वर रोड,नागपूर) यांची सुटका करून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

त्यानंतर पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी आखलेल्या योजनेनुसार संडासावरून मागील गॅलरीतील उघडया असलेले दरवाज्यातून पोउपआयुक्त  गजानन राजमाने.यांचेसह सपोनि ओमप्रकाश सोनटक्के, गुन्हेशाखा नागपूर सपोनि स्वप्नील भुजबळ, पोस्टे हुडकेश्वर, सपोनि सत्यवान कदम पोस्टे हुडकेश्वर, पोहवा बबन राउत, नापोशी प्रशांत कोडापे, गुन्हेशाखा नागपूर यांनी घराचे आत प्रवेश केला. घराचे आत प्रवेश करून पहील्या माळयावर बारईकाईने पाहणी केली. त्यानंतर तळमजल्यावर खाली उतरणाऱ्या पायऱ्याकडील दरवाजा हळूच उघडून खाली उतरून खालील परीस्थीतीचा अंदाजा घेतला असता आरोपी याने समोरील हॉलमध्ये महीलांना वेठीस धरून तेथे सतर्क असल्याचे त्याचे बोलने व हालचालीवरून तसेच बाजुच्या इमारतीवर असलेल्या साध्या पोषाखातील कर्मचारी यांनी इशारा करून कळविल्याने समजले.
त्यामुळे वर पहीले माळयावर जावून आरोपीस गाफील करण्याची योजना आखण्यात आली.

आतमध्ये हॉल लहान असल्याने व पिस्टलने आरोपीवर फायर केल्यास बुलेट भिंतीवर.आदळून परावर्तीत होवून वेठीस धरलेले महीलांना किंवा पोलीस पथकास लगण्याची शक्यता असल्याने शक्यतोवर पिस्टलचा वापर न करता आरोपी गाफील असतांना त्याला जेरबंद करण्याची योजना आखली. त्यानुसार मागील पश्चीमेकडील भागातून आरोपीचा आवाज ऐकू आल्याने व सदर घटनास्थळाला घेरून असलेल्या बाजूचे इमारतीवरील साध्या पोशाखातील पोलीसांनी इशारा करून कळविल्याने आरोपी गाफील असल्याचे खात्री झाल्याने याच संधीचा फायदा घेवून पोलीस उपायुक्त  गजानन राजमाने, सपोनि ओमप्रकाश सोनटक्के, सपोनि स्वप्नील भुजबळ, नापोशी प्रशांत कोडापे असे पायऱ्यातून खाली उतरून वेठीस धरलेले महीला हॉलमध्ये असल्याचे कानोसा
घेवून बाहेरून बंद असलेले दक्षीण मुखी द्वार हळूच उघडले व लपून पाहणी केली असता वेठीस धरलेल्या तीन महिला हॉलमध्ये बसले असल्याची खात्री करून लपूनच आत प्रवेश करत असतांना आरोपी हा हॉलमध्ये आला असता योजनाबध्द रित्या मोठया शिताफीने त्याचेवर झडप घालून आरोपी  जितेंद्र याला अटक केली. त्यास निशस्त्र करून त्याचे हातातील शस्त्र एक लोखंडी चाकू व माउजर पोस्टे हुडकेश्वर येथील अधिकारी यांनी रितसर जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त केले तसेच आरोपीने खंडणी म्हणून घेतलेली रक्कम ५ लाख रूपये देखील पंचनाम्याप्रमाणे जप्त केले तसेच तळमजल्यावर वेठीस धरलेल्या  वैशाली बंडूजी वैद्य, श्वेता बंडूजी वैद्य, वच्छलाबाई रघूनाथजी वैद्य यांना मुक्त करून बाहेर सुरक्षीतपणे काढण्यात आले.

आरोपीस सविस्तर विचारणा केली असता त्याने राजू वैद्य याचे हुडकेश्वर रोडवरील मोठे घर तसेच त्याचेकडे असलेले महागडया ४ चाकी गाडया पाहून व राजू वैद्य हा लँड डेव्हलपर्स व बिल्डर असल्याचे माहीती असल्याने त्याचेकडून त्वरीत मोठी रक्कम प्राप्त करता येईल म्हणून आरोपीने योजनाबध्द पध्दतीने राजू वैद्य याचे घरी १२ वाजता घरात प्रवेश करून त्याचे घरात हजर असलेले महीला व मुलींना अग्नीशस्त्र व प्राणघातक चाकूने धाक दाखवून
५० लाख रू उकळणार होता असे सांगीतले.

सदरची कामगिरी नागपूर शहराचे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सुनिल फुलारी यांचे निर्देशान्वये पोलीस उपायुक्त, परीमंडळ कमांक ०४, नागपूर शहर डॉ. अक्षय शिंदे यांचे मार्गदर्शनात तसेच मा. पोलीस उपायुक्त (डिटेक्शन)  गजानन शिवलींग राजमाने यांचे उपस्थीतीत व नेतृत्वात  सहायक पोलीस आयुक्त(सक्करदरा विभाग) डॉ. निलेश पालवे, सहायक पोलीस आयुक्त(गुन्हे)  बी. एन. नलावडे यांचे उपस्थीतीत वरीष्ठ पोलीस निरीक्षक, पोस्टे हुडकेश्वर श्री प्रतापराव भोसले, सपोनि ओमप्रकाश सोनटक्के, गुन्हेशाखा नागपूर, सपोनि स्वप्नील भुजबळ, पोस्टे हुडकेश्वर, सपोनि सत्यवान कदम पोस्टे हुडकेश्वर, पोहवा बबन राउत, गुन्हेशाखा, नापोशी प्रशांत कोडापे गुन्हेशाखा पोस्टे हुडकेश्वर येथील पोहवा शैलेष ठवरे, नापोशी अश्वीन बडगे, नापोशी आशिष तितरमारे, पोशी प्रदिप बदाडे, पोहवा मनोज नेवारे, नापोशी ललीत तितरमारे, नापोशी चंद्रशेखर भारती यांनी केली.

 

पिंपरी चिंचवडमध्य बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाचा दुचाकीस्वाराने फरफटले ; घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर


पिंपरी चिंचवड :नाकाबंदी दरम्यान चौकशीसाठी दुचाकीस्वाराला थांबण्याचा इशारा केला असता त्याने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला 50 फूट फरफटत नेले.ही घटना वाकड हिंजवडी रोडवर इंडियन पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी (दि.28) रात्री साडे सातच्या सुमारास घडली.या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला असून पोलीसांनी  दुचाकी चालकाला अटक करण्यात आली आहे.

संजय एकनाथ शेडगे (वय ४२, रा. मु पो आढाले, खुर्द, ता. मावळ) याला अटक केली आहे.याप्रकरणी हिंजवडी वाहतूक विभागातील पोलीस हवालदार शंकर तुकाराम इंगळे (वय ४७) यांनी वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस हवालदार शंकर तुकाराम इंगळे आपल्या सहकाऱ्यांसह वाकड हिंजवडी रोडवर नाकाबंदीच्या कर्तव्यावर होते. त्यांनी संजय याला गाडी बाजूला घेऊन त्याच्याकडे गाडीचे लायसन्स, कागदपत्रेबाबत विचारणा केली. तेव्हा ते धक्का देऊन पळून जाऊ लागले. त्यावेळी त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. गाडीच्या मागील बाजूस फायबरचे कॅरिअरला त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इंगळे यांचा हात अडकला. त्यांनी त्यास थांब थांब म्हणाले. तरीही स्कुटीचालकाने गाडी न थांबविता त्यांना ५० फुट अंतरापर्यंत ओढत फरफटत नेले. त्यामुळे फिर्यादीचे डावे पायाचे गुढग्याला, उजव्या पायाचे टाचेला मार लागून कपडे फाटले व दुखापत झाली. पोलिसांनी सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करुन दुचाकीस्वाराला अटक केली आहे.

‘जे खरं आहे, तेच करतो, खोटं काही करत नाही’, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश पत्रकारांवर भडकले!


पिंपरी चिंचवड :पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला रत्नागिरीतील पावसमधून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आज एका पत्रकारावर भडकल्याचं पाहायला मिळालं! गोळीबार हा पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या दिशेने झाला हे तपासात स्पष्ट झालं का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश चांगलेच भडकले. तुम्ही पत्रकार नियोजनबद्ध कट रचून आलेला आहात. आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली. इतकी चांगली आणि कठोर कारवाई करुनही तुम्ही प्रश्न विचारत आहात. तुम्हाला कुणी असे प्रश्न विचारा म्हणून नियोजन करुन पाठवले आहे का? असा प्रश्न विचारतानाच मी जे बोलतो तेच करतो, असा दावा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केलाय.

पिंपरी-चिंचवडमधील आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील आरोपी तानाजी पवारने आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे आणि त्याच्या साथीदारांवरच अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये सिद्धार्थ बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला. तानाजी पवार यांच्या कंपनीकडूनही सिद्धार्थवर कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलिस सिद्धार्थ बनसोडेचा शोध घेत होते. त्यानंतर अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील पावसमधून त्याला अटक करण्यात आली .आता सिद्धार्ध बनसोडेसह ४ आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेत आतापर्यंत सिद्धार्थ बनसोडे याच्यासह १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सिद्धार्थ बनसोडेवर मारहाणीचा गुन्हा

पिंपरी-चिंचवडमधील आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील आरोपी तानाजी पवारने आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे आणि त्याच्या साथीदारांवरच अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये सिद्धार्थ बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला. तानाजी पवार यांच्या कंपनीकडूनही सिद्धार्थवर कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलिस सिद्धार्थ बनसोडेचा शोध घेत होते. त्यानंतर अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील पावसमधून त्याला अटक करण्यात आली .चिंचवड महापालिकेचे कंत्राटदार सिजू अँथनी यांच्या कार्यालयात सिद्धार्थ बनसोडे 11 मे रोजी दुपारी घुसले होते. तिथल्या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोखंडी रॉडसारख्या घातक शस्त्राने दोघांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. अँथनी यांच्या कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत याबाबत कर्मचाऱ्यांनी माहिती दिली नाही. त्यामुळे सिद्धार्थ बनसोडे, त्यांच्या पीए सह 10 जणांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.

कोण आहेत अण्णा बनसोडे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे हे 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. यापूर्वी ते 2009 मध्येही निवडून आले होते. नंतर 2014 मध्ये अण्णा बनसोडे यांचा शिवसेना उमेदवार गौतम चाबुकस्वार यांनी 2 हजार मतांनी पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी पिंपरी मतदारसंघात जनसंपर्क वाढवला. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत अण्णा बनसोडे यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार गौतम चाबुकस्वार यांचा 16 हजार 856 मतांनी पराभव केला होता.

कंपन्यांना पाणी पुरविण्याच्या वादातून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या ९ जणांना अटक


पिंपरी चिंचवड : कंपनीत पाणी पुरवण्याच्या कारणावरून एका व्यावसायिकावर कोयत्याने वार करत भर रस्त्यात त्याचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 14) दुपारी खेड तालुक्यातील म्हाळुगे गावात घडली. या गुन्ह्यातील ८ आरोपीं व गुन्हा करणाऱ्या आरोपीना पळुन जाण्यास मदत करणारा १ आरोपी अश्या एकुण ०९ आरोपीना  पोलिसांनी अटक केली आहे.

अक्षय अशोक शिवळे (वय २५ वर्ष, रा महाळुगे, ता खेड, जि पुणे), दिपक बाळु पिंजन (वय २५ वर्ष, रा महाळुगे, ता खेड, जि पुणे), वैभव उर्फ सोन्या अरुण खोंडगे (वय २२ वर्ष रा महाळुगेे,), गौरव गजानन मुळे (वय २३ वर्ष, रा महाळुगे, ता खेड जि पुणे), विनोद उर्फ सोन्या गणेश पवार (वय १९ वर्ष, रा शेलु ठाकरवाडी), आकाश उर्फ गण्या रवी धरमाळे (वय १९ वर्ष, रा महाळुगे,), ऋषिकेश उर्फ गोटया सुनिल भालेराव (वय २० वर्ष, रा महाळुगे), अभिषेक बुध्दसेन पांडे (वय १९ वर्ष, रा खालुब्रे, ता खेड, पुणे) व अनिल शांताराम शिंदे (वय २२ वर्ष, रा आडे, ता खेड जि पुणेे ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

अतुल तानाजी भोसले असे खूनी  झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत अक्षय पंडित बो-हाडे (वय 26 रा. म्हाळुगे, ता.खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अतुल भोसले यांचा कंपनीत पाणी सप्लाय करण्याचा व्यवसाय आहे. पाण्याचे टँकर पुरवण्याच्या कारणावरून अतुल भोसले आणि आरोपी अक्षय शिवले या दोघांमध्ये फोनवरून वाद झाला. या वादातून म्हाळुंगे येथे चाकण तळेगाव रस्त्यालगत अतुल तानाजी भोसले यांच्यावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता.

महाळुगे पोलीस चौकीकडील गुन्हे शोध पथक, गुन्हे शाखा कडील क्राईम युनिट-३ व भोसरी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक यामधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वेगवेगळया ठिकाणाहुन गुन्हयातील निष्पन्न ८ आरोपी व गुन्हा करणारे आरोपीतांना पळुन जाण्यास मदत करणारा १ आरोपी असे एकुण ९ आरोपीना तपास कामी ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,  पोलीस उप आयुक्त(गुन्हे) सुधीर हिरेमठ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १  मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे व सागर कवडे, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली महाळुगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, क्राईम युनिट क्र -३ चे पोलीस निरीक्षक- शंकर बाबर, स.पो.निरीक्षक दत्तात्रय गुळीग व सुरेश यमगर, पो.उप.निरी-गिरीष चामले, विलास गोसावी, पोलीस हवालदार चंदु गवारी, राजु कोणकेरी, राजु जाधव, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष काळे, हिरामन सांगडे, श्रीधन इचके, शरद खैरे यांनी व भोसरी पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकामधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा.पो.निरी.सुरेश यमगर हे करीत आहेत.

VIDEO: ‘त्या’ कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीसाची मध्यरात्री थेट पोलीस स्थानकात एण्ट्री, अधिकाऱ्यांवर का भडकले?


मुंबई: काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांच्या विनंतीवरुन महाराष्ट्राला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन द्यायला तयार झालेल्या ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात  घेतल्यानंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट पोलीस स्थानकात धाव घेतली. या दोन्ही नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर डोकनिया यांना पोलिसांकडून रात्री उशिरा सोडण्यात आलं आहे.

बीकेसी पोलीस ठाण्यात फडणवीस यांच्यासह विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा आमदार पराग अळवणी, आमदार प्रसाद लाडही सोबत होते. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठ्या संदर्भात डोकनिया यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. मात्र भाजप नेत्यांनी पोलीस स्थानकात दाखल होत आक्रमक भूमिका घेतली. या सर्व घटनाक्रमानंतर राजेश डोकनिया यांना सोडून देण्यात आलं.

म्हणून मी भाजपच्या नेत्यांसह पोलीस ठाण्यात आलो: फडणवीस

पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बाहेर पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे दमणच्या कंपनीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी गेले होते. त्यावेळी कंपनीने आम्हाला केंद्राची परवानगी मिळाल्यास आम्ही रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा सर्व साठा महाराष्ट्राला द्यायला तयार आहोत, असे सांगितले. त्यानुसार मी केंद्र सरकारशी बोलून परवानगी घेतली होती. त्यानंतर कंपनीने काही साठा महाराष्ट्रात पाठवलाही होता.

मात्र, शनिवारी दुपारच्या सुमारास ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या ओएसडीने ब्रुक्स फार्माचे मालक राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांच्या म्हणण्यावर रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स लगेच कशी दिलीत, असा सवाल त्यांनी डोकनिया यांना विचारला. त्यानंतर संध्याकाळी काही पोलीस कर्मचारी डोकनिया यांच्या घरी गेले आणि त्यांना उचलून इकडे आणलं. त्यामुळे मला आणि भाजपच्या नेत्यांना इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात यावे लागले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे.

पोलिसांचं म्हणणं काय?

या सगळ्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले. डोकानिया यांच्याकडे 60 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा होता. त्यामुळे आम्ही त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीदरम्यान राजेश डोकानिया यांनी सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखवल्यानंतर आम्ही त्यांना सोडून दिले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

काय आहे सगळा प्रकार?

राज्यात काही दिवसांपूर्वी रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा प्रचंड तुटवडा होता. राज्य सरकार त्यावेळी रेमडेसिव्ही इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करत होते. अशातच 12 एप्रिलला भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे थेट दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना 50 हजार इंजेक्शन्स देण्यात आली होती. ही सर्व इंजेक्शन्स आम्ही महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले होते.

औरंगाबादेत पोलिस मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप, सीसीटीव्ही व्हिडिओमधून नवा खुलासा


औरंगाबाद :पोलिसांच्या मारहाणीत औरंगाबादमध्ये सलून व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत काल उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता. मात्र आता या घटनेत एक ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण परिसरातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये सलून चालक पोलिसांशी बोलत असतानाच अचानक जमिनीवर कोसळल्याचं दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला मारहाण केली की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे

शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण डोक्याला गंभीर दुखापत हे असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र सलून चालक फिरोज खान हे पोलिसांशी बोलताना चक्कर येऊन पडल्याचे सीसीटीव्ही व्हिडिओत दिसत आहे. तसंच फिरोज खान यांना पोलिसांनी मारहाण केल्याचं या व्हिडिओमध्ये तरी दिसत नाही. या सीसीटीव्ही व्हिडिओमुळे आता या घटनेनं नवं वळण घेतलं असून यापुढे आणखी काय खुलासा होतो, हे पाहावं लागेल.

नेमकं काय आहे प्रकरण?

कोरोनामुळे जिल्ह्यातील सामान्यांची परिस्थिती भयानक होत आहे. अशात शासनाच्या आदेशामुळे व्यापारी, दुकानदार आणि इतर लोकांना त्यांची दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. शहरात सगळीकडे दुकाने बंद आहेत. या काळात उस्मानपूरा भागातील सलून व्यावसायिक फिरोज खान यांनी सलून उघडलं.दुकान सुरू असल्यामुळे पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई केली.

कारवाईनंतर सलून चालकाला पोलिस स्टेशनला घेऊन जाताना त्याचा त्यातच मृत्यू झाला. यानंतर सलून चालकाच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या मारहाणीतच मृत्यू झाल्याचा आरोप केला  होता. कारवाई केलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती आणि उस्मानपूरा पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले

दरम्यान, समोर आलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलीस बोलत असताना सलून चालक अचानक जमिनीवर कोसळल्याचं दिसत आहे. त्यांना परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात हलवल्याचंही फूटेजमध्ये दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी सलून चालकाला मारहाण केली की नाही, असा संभ्रम आता निर्माण होत आहे.

 

 

शरजील उस्मानी कुठेही असला तरी त्याला शोधून अटक करू; गृहमंत्री देशमुखांची माहिती


मुंबई : शार्जील उस्मानी सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करु असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. याबाबत त्यांनी ट्‌वीट करुन माहिती दिली.

त्यांनी ट्‌वीटमध्ये लिहिले की, पुण्यात 30 तारखेला झालेल्या एल्गार परिषदेत शार्जील उस्मानीने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडीओ क्‍लिपिंग पोलिसांनी तपासली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सध्या महाराष्ट्र पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तो सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये असण्याची शक्‍यता आहे. तो कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करु. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

दरम्यान, शार्जील उस्मानीवर पुण्यातील स्वारगेट पोलीस स्थानकात चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलीस स्थानकाच्या हद्दीत गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी शनिवारी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

शरजील विरोधात गुन्हा दाखल होऊनही त्याला अद्याप अटक का केली जात नाही? असा सवाल भाजप नेत्यांनी उपस्थित केला होता. त्यावरील उत्तरात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरजील सध्या महाराष्ट्रात नसल्याची माहिती दिली. “पुण्यात ३० जानेवारीला एल्गार परिषदेत उस्मानी याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडिओ क्लिपिंग पोलिसांनी तपासली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करू”, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

 

 

पुणे- सोलापूर महामार्गावर अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; तब्बल 25 लाखाचा मुद्देमाल जप्त


थेऊर :  पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर पोलिस स्टेशन परिक्षेत्रात अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल 25 लाखाचा गुटखा जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

सुरेश मिलापचंद ओसवाल (वय वर्षे 44 रा. चितामंणी पार्श्‍वनाथ बिल्डींग, महात्मा फुले नगर, माळी मळा लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) व अविनाश भारत जाधव (वय वर्षे 25 रा. नायगांव ता. हवेली जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी पोलीस हवालदार राजु पुणेकर यांनी सरकारतर्फे कायदेशीर  लोणीकाळभोर पेालीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,सोलापुर पुणे रोडवर सरकारी जीपने पेट्रोलिंग करीत असताना लोणी काळभोर गावाच्या हद्दीत राजेंद्र पेट्रोल पंपाच्या समोर पुणे बाजुकडे जाणार्‍या रोडच्या कडेला असणार्‍या अंबरनाथ फर्निचर दुकानासमोर दोन्ही आरोपीनी एकत्रीत संगनमताने कोव्हीड या रोगाचे संसर्गजन्य आजाराची साथ सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करून तसेच महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदीचा आदेश असताना या आदेशाचा भंग करून 25 लाख 44  हजार 172 रुपये  (गुटखा, वाहन,मोबाईल व रोखरक्कम सह) किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा व साधने त्याच्या ताब्यातील महेंद्र बोलेरो पिकअप नंबर एम.एच.12/एस.एफ/6933 मध्ये स्वतःच्या आर्थीक फायदयाकरिता बेकायदेशीरपणे वाहतुक करीत असताना मिळुन आल्याने त्यांच्या विरूध्द सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद लोणीकाळभोर पेालीस स्टेशनला दिली आहे.

यापूर्वी या आरोपीवर बेकायदेशीर गुटखा विक्रीचे गुन्हे आहेत 28 -1-21 रोजी अन्न व औषध प्रशासन पुणेचे पथकाने येथील गुटखा माफियाच्या घरावर छापा टाकून तब्बल 2 लाख 38 हजार 340 रुपये किंमतीचा गुटका व सुगंधी तंबाखू या प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त केला आहे.

सुरेश मिलापचंद ओसवाल हा या परिसरातील मोठा गुटखाकिंग असून यापुर्वी 17 जुलै 2017 रोजी मध्यरात्री शिंदवणे घाटात त्यांने कर्नाटक राज्यातून स्वीफ्ट कारमधून आणलेला कारसह गुटखा असा एकून 8 लाख 25 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंंतर 28 सप्टेंबर 2017 रोजी त्याने नायगांव (ता. हवेली) येथील मार्गवस्ती येथील एका घरात ठेवलेला 3 लाख 36 हजार रुपये किमतीचा गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला होता. तर 31 जुलै 2019 रोजी याचं ठिकाणावरून 5 लाख 35 हजार 20 रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे.

सदरची कामगिरी LCB चे वरिष्ठ पो नि. पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांने केलेली आहे. पोउपनि.रामेश्वर धोंडगे, स.फौ.दत्तात्रय जगताप, पोहवा.राजु पुणेकर,पोहवा.मुकुंद अयाचित, पोना.सागर चंद्रशेखर, पोकॉ.बाळासाहेब खडके

 

ATM मधून पैसे काढताना अशी चोरली जाते तुमची गोपनीय माहिती; जाणून घ्या


पुणे :कोरोना काळात डिजिटल बँकिकमध्ये मोठी वाढ झाली आहे. ज्या प्रमाणात डिजिटल बँकिंग वाढतंय, त्याच वेगात ऑनलाईन पेमेंट सुविधांसह बँकिंग फ्रॉडचं प्रमाणही वाढतं आहे. त्याशिवाय एटीएम ट्रान्झेक्शन फ्रॉडचीही अनेक प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे एटीएममधून पैसे काढताना सावध राहा, कारण एटीएममधून पैसे काढताना एखाद्या चुकीमुळे, तुमचं अकाउंटही खाली होण्याचा धोका आहे. बँकांकडूनही वेळोवेळी एटीएम फ्रॉडबाबत अलर्ट केलं जातं.

ATM फ्रॉडपासून वाचण्यासाठी हा व्हिडिओ बघा

 

Video – महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची लाच स्वीकारण्याची नवी शक्कल


पिंपरी चिंचवड : एका महिला वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेने कारवाई टाळण्यासाठी लाच घेण्याची नवी टूम शोधली आहे. ती टूम एका कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एक तरुणी चक्क या महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या खिशात पैसे ठेवतानाचा व्हिडीओ सध्या शहरात व्हायरल होत आहे.

एका वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेने कारवाई टाळण्यासाठी लाच घेण्याची नवी टूम शोधली आहे.

पिंपरीच्या शगुन चौकातील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळाली आहे. या वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेनं कारवाई टाळण्यासाठी एका तरुणीकडून लाच स्वीकारली. एवढेच नव्हे तर लाचेचे पैसे पॅन्टच्या पाठीमागच्या खिशात ठेवण्यास तरुणीला सांगितले.

दरम्यान, हा सर्व प्रकार रस्त्याकडेला असलेल्या इमारतीमधील मुलांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला. सध्या हा व्हिडिओ शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

याप्रकरणी पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले म्हणाले, या व्हिडिओची दखल घेतली असून, व्हिडिओची चौकशी करून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल. व्हिडीओत दिसणा-या इतर कर्मचाऱ्यांची देखील चौकशी केली जाईल.

विभागाला कलंकित करण्याचा कोणताही कर्मचारी प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच पुन्हा असा अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे डिसले यांनी सांगितले.