Crime

लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे रविवारी उद्घाटन


पुणे : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे रविवार ३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिली आहे.

येरवडा येथील सामाजिक न्याय भवनाच्या आवारात हे कार्यालय सुरू करण्यात येत आहे. या कार्यक्रमास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आदी उपस्थित राहणार आहेत.

 

ऊसतोड कामगारांची नोंदणी केलेल्या कामगारांना यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्र दिले जाणार आहेत. ऊसतोड कामगारांसाठी भविष्यात राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी हे ओळखपत्र महत्त्वाचे ठरणार आहे, असेही श्री. भांगे यांनी कळवले आहे.