• December 6, 2023
  • No Comment

ललित पाटील प्रकरणात प्रथमच दोन बड्या अधिकाऱ्यांना अटक

ललित पाटील प्रकरणात प्रथमच दोन बड्या अधिकाऱ्यांना अटक

    पुणे : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलीस आक्रमक झाले आहे. पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत कर्मचारी आणि ललित पाटील याचे मित्र आणि नातेवाईकांना अटक झाली. मात्र आता या प्रकरणात प्रथमच दोन बड्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पुणे येथील येरवडा कारागृह प्रशासनाच्या रडारवर आले आहे. पुणे पोलिसांनी कारागृहातील समुपदेशक आणि वैद्यकीय अधिकारी अशा दोन जणांना अटक केली आहे. प्रथमच मोठ्या अधिकाऱ्यांना अटक झाली आहे. यामुळे कारागृह प्रशासनातील गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे.
    पुणे पोलिसांनी कारागृहातील समुपदेशक सुधाकर इंगळे यांना अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून येरवडा कारागृहाचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. संजय मरसाळे यांचे नाव समोर आले. सुधाकर इंगळेमार्फत डॉ. संजय मरसळे यांना पैसे मिळाल्याचा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात केला. त्यानंतर पुणे पोलिसांनी सुधाकर इंगळे आणि डॉक्टर संजय मरसळे या दोघांना अटक केली आहे.

    पळून जाण्यापूर्वी होता संपर्कात
    डॉक्टर संजय मरसळे हा ललित पाटील पळून जाण्याच्या २ दिवस आधी त्याच्याशी संपर्कात होता. डॉ. संजय मरसळे याने पैसे घेऊन ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी शिफारस केली होती. यानंतर पोलिसांनी डॉक्टर संजय मरसळे याच्या मोबाईलची तपासणी केली. त्यात त्यांना अभिषेक बलकवडे याचे कॉल मिळाले. बलकवडे हा ललित पाटील याचा ड्रग्स कंपनी सांभाळणारा साथीदार आहे.
    ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहानंतर ससूनमधील एका बड्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. ससून रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी प्रवीण देवकाते याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. ललित पाटील याला मदत केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला याआधी निलंबित करण्यात आले होते. ललित पाटीलला याला पळून जाण्यास देखील देवकाते यांनी मदत केल्याचा पुणे पोलिसांचा आरोप आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *