• December 19, 2024
  • No Comment

रात्री प्रवाशांना लुटणारा तडीपार गुंड जेरबंद

रात्री प्रवाशांना लुटणारा तडीपार गुंड जेरबंद

    पुणे: रात्री प्रवाशांना लुट मार करत धमकावणारा तडीपार गुंड जेरबंद.

    या प्रकरणी छोट्या उर्फ अभिषेक शिवाजी आल्टे (वय २३ रा. बाबाजान चौक, लष्कर), अमर विशाल खरात (वय १९ रा. साईबाबा मंदिरासमोर, लष्कर), जयेश गणेश भिसे (वय १९, रा. कासेवाडी, भवानी पेठ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

    याबाबत एकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

    तक्रारदार लातूरहून पुण्यात आले होते. लष्कर भागातून ते रविवारी (१५ डिसेंबर) निघाले होते. त्यावेळी तडीपार गुंड छोट्या, त्याचे साथीदार अमर, जयेश यांनी त्यांना अडवले. धमकावून त्यांच्याकडील मोबाइल संच चोरून तिघे जण पसार झाले. घाबरलेल्या प्रवाशाने लष्कर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन तिघांना पकडले. आरोपींकडून दोन दुचाकी आणि मोबाइल संच जप्त करण्यात आला.

    वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, उपनिरीक्षक प्रदीप पवार, राहुल घाडगे, ज्योती कुटे, पोलीस कर्मचारी महेश कदम, सोमनाथ बनसोडे, संदीप उकिर्डे, रमेश चौधर यांनी ही कामगिरी केली.

    Related post

    मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचे बिगुल; ३० एप्रिलला मतदान

    मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचे बिगुल; ३० एप्रिलला मतदान

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : मार्केट यार्डमधील फळ, भाजीपाला, केळी, पान तसेच कांदा-बटाटा विभागातील आडत्यांची शिखर संघटना असलेल्या श्री छत्रपती…
    गुलटेकडी मार्केट यार्डात तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घाण पाण्याचा पूर; दुर्गंधीने त्रस्त बाजार

    गुलटेकडी मार्केट यार्डात तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घाण पाण्याचा पूर; दुर्गंधीने…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पूणे : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत असल्याने नागरिक, व्यापारी आणि शेतकरी यांना मोठ्या…
    महंमदवाडीत टँकरने दुचाकीला दिली धडक; १९ वर्षीय खेळाडू ठार

    महंमदवाडीत टँकरने दुचाकीला दिली धडक; १९ वर्षीय खेळाडू ठार

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे – भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका तरुण फुटबॉलपटूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *