• January 12, 2025
  • No Comment

धक्कादायक! २० वर्षीय तरुण पिस्टल विकताना पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायक! २० वर्षीय तरुण पिस्टल विकताना पोलिसांच्या ताब्यात

    कात्रज (पुणे): कात्रज येथील मस्तान हॉटेलजवळ सहकारनगर पोलिसांनी तळजाई वसाहतीतील अवघ्या २० वर्षीय तरुणाला पिस्टल विकताना पकडले आहे.

    या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’हा तरुण सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ०१ पिस्टल ०२ राऊंड असा ४८,८००/- रु.कि.चा मुददेमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.

    पोलीसांनी दिलेल्‍यामाहितीनुसार,’पुणे शहरात सराईत गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई तसेच अग्निशस्त्रे बाळगणा-या इसमांना वेळोवेळी त्यास चेक करुन कायदेशीर कारवाई करणेचे आदेशीत करण्यात आले होते. त्याअनुषगाने पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ०२ कडील अधिकारी व अमंलदार हददीत गस्त करीत असताना दि. ११/०१/२०२५ रोजी पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मस्तान हॉटेल जवळ कात्रज रोडवर एक इसम पिस्टल/अग्नीशस्त्र घेवून येणार आहेत अशी बातमी मिळाली.

    सदर बातमी युनीटचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना दिली असता त्यांनी युनिट कडील अधिकारी व अमंलदार यांना कारवाई चे आदेश दिले. त्याप्रमाणे युनिट कडील अधिकारी व अमंलदार यांनी मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे गुन्हेगार सोहम शशिकात वाघमारे (वय २०) रा तळजाई वसाहत सहकारनगर पुणे यास ताब्यात घेवून त्याचेकडून ०१ लोखंडी पिस्टल मॅगझीनसह व ०२ जिवंत काडतुसे असा ४८,८०० /- रु कि.चा माल जप्त केला आहे. आरोपीने सदर अग्निशस्त्र व काडतुसे हे अनाधिकाराने बेकायदेशीर रित्या विनापरवाना जवळ बाळगून विक्रीकरीता घेवून आल्याबाबत कबुली दिली आहे.

    आरोपीविरुद्ध भारती विदयापीठ पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि क्रमांक ३१/२०२५ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आला आहे. अधिक तपास चालु आहे.

    सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा. पो. आयुक्त गुन्हे, १ श्री गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, सपोनि आशिष कवठेकर, अमोल रसाळ, पो.उप.निरी नितीन कांबळे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, अमोल सरडे, गणेश थोरात, ओमकार कुंभार, हनुमत कांबळे, विनोद चव्हाण, प्रमोद कोकणे विजयकुमार पवार, राहुल शिंदे, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख, यांनी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *