• November 6, 2025
  • No Comment

फलटण प्रकरणातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने पोलीस खात्यातून बडतर्फ

फलटण प्रकरणातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने पोलीस खात्यातून बडतर्फ

    फलटण :येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही पडले. आत्महत्यापूर्वी डॉक्टर तरुणीने स्वतःच्या हातावर पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने चार वेळा अत्याचार केल्याचं लिहित आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते व पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान फलटणच्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी गोपाळ बदने याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आल्याचा आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिलाय. कलम 311 (2) अंतर्गत निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेची शासकीय सेवा बडतर्फ करण्यात आली आहे

    दरम्यान, फलटण प्रकरणातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याची खाते अंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. चौकशी अधिकारी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी 72 तासामध्ये पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे रिपोर्ट सादर केला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *