छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंती सकाळी 9 वाजता लालमहाल येथून शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा”या भावी दिवे मे रोनकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीचे यंदा सलग 14 वे वर्ष होते. सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे आणी वीर मातांच्या तब्बल 96 स्वराज्यरथांचा सहभाग हे या सोहळ्याचे वैशिष्ट्ये होते. अशी माहिती सोहळ्याचे संकल्पक आणि समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.

    या मिरवणुकीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, पुणे महापौर मंजुषा नागपूरे, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पिंपरी चिंचवड महापौर रवी लांडगे, पोलीस उपायुक्त परिमंडळ एक ऋषिकेश राहुल, आमदार भीमराव तापकीर, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, शंकर मांडेकर तसेच सर्व स्वराज्य घराण्याचे प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी सुनील रासने ज्येष्ठ विधीज्ञ प्रताप परदेशी उपस्थित होते.

    समितीच्या जिजाऊ मासाहेब शहाजी महाराज शिवज्योत या मानाच्या मुख्य स्वराज्य रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, त्रिंबकराव नाईक निवगुणे, सरदार करंजावणे देशमुख, सरदार चांगोजी कडू, आढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सूर्याजी काकडे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, सरसेनापती संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, सरदार झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, गोदाजी भुरुक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावाची बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिम्मतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई स्वराज्यबांधव , श्रीमंत सरदार लखोजीराजे जाधवराव, गरुड घराणे, चंद्रवंशी ( भोपतराव) श्रीमंत सरदार लखुजीराव घारे, महाशक्तिशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगद्गुरु संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्य रथ, श्रीमंत हरजीराजे महाडिक, महाशक्तिशाली रणमर्द सरदार संभाजी कोंढाळकर, सरनोबत पिलाजी गोळे, सरदार प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, सरदार पिलाजीराव शिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला, श्रीमंत पवार घराणे, श्रीमंत गायकवाड सरकार, श्रीमंत महादजी शिंदे सरकार, गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक, शिवरत्न शिवाजी काशीद जिवाजी महाले, सरदार जिवाजी शुभानजी रणवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शूरवीर इकोजी शिरोळे, शूरवीर शेलार मामा, राजश्री सरदार हांडे, सरदार भोईटे, सरदार मांढरे स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरिजीराजे बर्गे, शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे, पानिपत वीर महादजी माळवदकर, पानिपत वीर महादजी व दादाजी हरपळे, प्रतापगड युद्धवीर सहस्त्री सरदार कोंडाजी वरखडे, दक्षिण दिग्विजय वीर मानाजी मोरे, स्वराज्याचे निष्ठावंत सरदार दरेकर, स्वराज्यांचे शिलेदार कुंजीर, स्वराज्यनिष्ठा शेळके, वीर फडतरे, राजे साळुंखे चालुक्य राजवंश, स्वराज्यनिष्ठ सरदार बाबर, सिंहगड वीर विठोजी कारके, दुर्ग अजिंक्यतारा वीर किल्लेदार मानाजी साबळे, शूरवीर सावंत स्वराज्य घराणे, सरदार मंबाजी नाईक सोनवणे, सरदार थोरात, सरदार वाबळे, सहस्त्री सरदार रामजी पांगरे, स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस, वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्वराज्यरथ आप आपला गौरवशाली इतिहास मांडत सहभागी झाले होते.

    भारताच्या इतिहासातील शिवकालीन युद्धकाल सादर करणाऱ्या 51 रणरागिनींचे औरंगासुर मर्दिनी भद्राकली रणरागिनी, महाराणी ताराराणी शौर्यपथक, मर्दिनी युद्ध कला सादर करण्यात आले आहेत. व नादब्रहा ट्रस्ट ढोल ताशा पथक, 51 रणसिंग पथक सहभागी झाले होते.

    सोहळ्याचे संकल्पक आणि समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, निलेश जेधे, समीर जाधवराव, गोपी पवार, प्रवीण भैया गायकवाड, मंगेश शिळीमकर, मोहन पासलकर, किरण शितोळे यांच्या असंख्य स्वराज्य बांधवांनी सोहळ्याचे आयोजन केले होते. पुणेकरांनी मोठ्या संख्येने या सोहळ्याला सहभाग दर्शवला होता. व शिवजयंती महोत्सव समितीचे युवा सदस्य ईशान आमिर गायकवाड एसएसपीएमएस शाळेतील श्री शिवछत्रपतीच्या पुणाकृती पुतळ्यावर सकाळी 11 ते 1 या वेळेत हेलिकॉप्टर मधून सलग 15 वर्षी पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *