• April 16, 2026
  • No Comment

कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या रस्त्यावर उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

     

    स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित बँड व्यवसायिकाने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता अनधिकृत शेड उभारले आहेत. तसेच रस्त्यावर सतत बँडच्या गाड्या पार्क केल्याने वाहतुकीची कोंडी होत असून पादचारी, स्थानिक वाहनधारक आणि आपत्कालीन सेवांनाही अडचणी निर्माण होत आहेत. डेकोरेशनचे साहित्य व इतर सामान सार्वजनिक जागेत टाकल्याने परिसरात अस्वच्छता वाढत आहे.

    या समस्येबाबत परिसरातील नागरिकांनी अनेकदा संबंधित व्यवसायिकाला समज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात आले. अखेर संतप्त झालेल्या जवळपास शंभरहून अधिक नागरिकांनी एकत्र येऊन महानगरपालिका, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडे लेखी अर्जाद्वारे तक्रारी दाखल केल्या आहेत.

    तरीही अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये रोष वाढत आहे. प्रशासनाने तातडीने जागेची पाहणी करून अनधिकृत शेड हटवावीत, रस्त्यावरील अतिक्रमण दूर करावे आणि नियमभंग करणाऱ्या संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *