• October 1, 2022
  • No Comment

कर्ज देण्याच्या बहाण्याने अडीच लाखांना घातला गंडा, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

कर्ज देण्याच्या बहाण्याने अडीच लाखांना घातला गंडा, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    वाकड: कर्ज देण्याच्या बहाण्याने बँकेचे कोरे धनादेश घेऊन अडीच लाखांची फसवणूक केली. ही घटना डांगे चौक , वाकड येथे घडली.

    अनिल शरद अहिरराव (वय 49, रा. चिखली) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बालाजी बळीराम घोडके (वय 32, रा. दौंड), संग्राम यादव (वय 45, रा. कोल्हापूर), बालाजी फायनान्सचे मालक मुजावर (रा. कोल्हापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादीस कर्ज देण्याच्या बहाण्याने दोन लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केली. फिर्यादी यांच्याकडून आरोपींनी सात कोरे धनादेश घेतले आहेत. आरोपींनी फिर्यादींप्रमाणे इतर लोकांना देखील कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *