- September 26, 2022
- No Comment
चालकानेच चोरली मालकाची कार,आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
रहाटणी: कार मालकाची चालकानेच कार चोरली आहे. याप्रकरणी चालकाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गजानननगर, रहाटणी येथे घडला.
संतोष कांबळे (वय 35) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पांडुरंग पुंडलिक जगताप (वय 44, रा. गजानननगर, रहाटणी) यांनी सोमवारी (दि. 26) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कारवर आरोपी संतोष हा चालक म्हणून काम करत होता. त्याने फिर्यादी यांचा विश्वासघात करून त्यांची अडीच लाख रुपये किमतीची कार (एमएच 14/जीयु 5734) आणि पाच हजारांचा मोबाईल फोन घेऊन 23 सप्टेंबर रोजी दुपारी निघून गेला. तो अद्याप परत न आल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकड पोलीस तपास करीत आहेत.