- October 30, 2022
- No Comment
रखडलेल्या पोलीस भरतीला अखेर सुरुवात, चौदा हजार जागांसाठी होणार मेगा भरती
मागील तीन वर्षापासून रखडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला अखेर सुरुवात होणार आहे. राज्य पोलीस दलातील पोलीस भरतीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. नोव्हेंबर 2022 पासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. याबाबतचे परिपत्रक पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांनी प्रसिद्ध केले आहे.
ही भरती फक्त पोलीस शिपाई पदांसाठीची असणार आहे. 14 हजार 956 जागा याद्वारे भरल्या जाणार आहेत. यासाठी येत्या 3 नोव्हेंबर पासून 30 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत असणार आहे. पोलीस शिपाई पदासाठी प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाईल आणि त्यानंतर 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
शारीरिक चाचणीत किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार 110 प्रमाणात शंभर गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. याशिवाय लेखी परीक्षेत सुद्धा किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य करण्यात आले आहे. एकूण 150 गुणांमधून अंतिम निवड केली जाणार आहे.