• March 28, 2024
  • No Comment

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन
रेकॉर्ड वरील अटल गुन्हेगार कुणाला ऊर्फ बाब्या ठाकुर हा इंद्रप्रस्थ लॉन्स कडुन भापकर मळयाकडील जाणारे रस्त्यावर येणार असुन त्याचेकडे चोरीचे दागिने असुन त्याने अंगात ग्रे रंगाचा फुल बाहयांचा शर्ट व काळे रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे. सदरची माहिती श्री. उल्हास कदम, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट- ६ पुणे शहर यांना कळवुन बातमी प्रमाणे जाऊन सदर ठिकाणाचे जवळ जाऊन आडबाजुस थांबुन आम्ही सर्वानी मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री केली असता नमुद वर्णनाचा इसम हा
संशयीत रित्या उभा असल्याचे दिसल्याने आम्ही त्याचेजवळ जात असतांना तो पळुन जाण्याच्या तयारीत
असतांना त्यास युनिटकडील पथकाने पकडले युनिटकडील पोलीस पथकाने त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने त्याचे नाव कुणाल ऊर्फ बाब्या प्रल्हाद ठाकुर वय २३ वर्षे रा.गोसावी वस्ती, बिराजदारनगर, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांची झडती घेतली असता त्याचेकडे सोन्याचे दागिने मिळुन आल्याने ते जप्त केले असुन सदर बाबत
त्याचेकडे चौकशी केली असता त्याचे चौकशीमध्ये तिन ठिकाणी घरफोडी केल्याचे उघडकीस आले.
सदर बाबत पोलीस स्टेशनकडील अभिलेख तपासला असता पुढील प्रमाणे…
१) वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ११३/२०२४ भा.द.वि. कलम ३८०, ४५७,
२) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १२६ / २०२४ भा.द.वि. कलम ३८०, ४५४
३) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २६ / २०२४ भा. द.वि. कलम ३८०,४५४,४५७
एकुण तिन गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले सदर गुन्हयातील एकुण १,५४,००० /- रुपये
किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नमुद आरोपी विरुद्ध यापुर्वी येरवडा, हडपसर, लोणावळा सिटी इत्यादी पोलीस स्टेशन
येथे घर फोडीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री. प्रवीण पवार
पोलीस उप आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. शैलेश बलकवडे, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, मा. श्री.
अमोल झेंडे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे, मा. श्री. सतिश गोवेकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे -२, यांचे
मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस अंमलदार विठ्ठल
खेडकर, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, शेखर काटे
ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.

Related post

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
पूर्व हवेली मध्ये सध्या होत आहे कॉलेज समोर रोड रोमियो चा रोड शो

पूर्व हवेली मध्ये सध्या होत आहे कॉलेज समोर रोड…

(लोणी काळभोर) – पूर्व हवेली मध्ये अनेक ठिकाणी रोड रोमिओचा कॉलेज समोर धुमाकूळ पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी टू व्हीलर गाड्यांच्या…
कोकणात विक्रीसाठी पाठविण्यासाठी शहरात आणलेला सुमारे ४५ हजार रुपये किमतीचा साडेचार किलो गांजा भोर पोलिसांनी पकडला

कोकणात विक्रीसाठी पाठविण्यासाठी शहरात आणलेला सुमारे ४५ हजार रुपये…

कोकणात विक्रीसाठी पाठविण्यासाठी शहरात आणलेला सुमारे ४५ हजार रुपये किमतीचा साडेचार किलो गांजा भोर पोलिसांनी पकडला असून वाहतूक करणा-या तरुणाला अटक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *