• March 24, 2024
  • No Comment

पूर्व हवेली मध्ये सध्या होत आहे कॉलेज समोर रोड रोमियो चा रोड शो

पूर्व हवेली मध्ये सध्या होत आहे कॉलेज समोर रोड रोमियो चा रोड शो

(लोणी काळभोर) – पूर्व हवेली मध्ये अनेक ठिकाणी रोड रोमिओचा कॉलेज समोर धुमाकूळ पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी टू व्हीलर गाड्यांच्या पुंगळ्या काढून शिट्ट्या मारत कॉलेज समोर थट्टा मस्करी ठिल्लर बाजी करत छेडछाड करताना कॉलेज समोर पाहायला मिळत आहे, सर्वसामान्य नागरिकांना हे सर्व त्रासदायक प्रकार रोज सकाळी पाहायला मिळतोय.

पोलीस प्रशासनाचा या रोड रोमियो वर कोणत्याही पद्धतींचा धाक दिसत नसल्यामुळे ह्या अशा रोड रोमियो वर कारवाई कोण करणारअनेक वेळा कारवाई केली असताना तरी देखील कॉलेजच्या समोर रोड रोमियो यांचा सुळसुळाट रोज सकाळी पाहायला मिळत आहे कॉलेजमध्ये काही ठराविक विद्यार्थी त्यांच्या ग्रुप मेंबरला फोन केल्यानंतर तो कॉलेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी भाईगिरी करून कॉलेजमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असतोत्यानंतर काही चांगले विद्यार्थी व विद्यार्थिनी त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेले असतात त्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना रोज रोड रोमियो पासून भयंकर त्रास होत आहे व शिक्षकांना देखील तसेच त्यांच्या घरच्यांना देखील पाहायला मिळत आहे परंतु हे सर्व होत असताना पोलीस प्रशासन गप्प का अशी चर्चा हवेली तालुक्यामधील पालकांमध्ये होत आहे अशा रोड रोमियो वर कारवाई होईल का असा प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे आशा रोड रोमियो ची पोलीस प्रशासन दिंड काढतील का व त्या रोड रोमियो वर कारवाई होईल का …?

अशी हवेली तालुक्यामधील विद्यार्थ्यांच्या पालकांची मागणी आहे व रोड रोमियो वर कायदेशीर कारवाई होईल का….? चौकट
अशा घटना हवेली तालुक्यामध्ये सातत्याने घडू लागल्या आहेत याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पालक वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली असून नाराजी व्यक्त होत आहे. काही विद्यार्थिनींनी या रोडरोमिओ ची चांगलीच धास्ती घेतली असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.

शिवसेना शहरप्रमुख लोणी काळभोर
संतोष बाबुराव भोसले

(महाराष्ट्र क्राईम वॉच प्रतिनिधी दिगंबर जोगदंड लोणी काळभोर)

Related post

धक्कादायक! २० वर्षीय तरुण पिस्टल विकताना पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायक! २० वर्षीय तरुण पिस्टल विकताना पोलिसांच्या ताब्यात

कात्रज (पुणे): कात्रज येथील मस्तान हॉटेलजवळ सहकारनगर पोलिसांनी तळजाई वसाहतीतील अवघ्या २० वर्षीय तरुणाला पिस्टल विकताना पकडले आहे. या संदर्भात पोलिसांनी…
पूर्ववैमनस्यातून पिस्तूल बाळगणाऱा तरुण गजाआड, गुन्हे शाखेच्या युनिट तीन ची उल्लेखनीय कामगिरी

पूर्ववैमनस्यातून पिस्तूल बाळगणाऱा तरुण गजाआड, गुन्हे शाखेच्या युनिट तीन…

पुणे: जमिनीच्या वादातून चुलत मामासोबत असलेले वाद तसेच वादातून मामाने दिलेल्या धमकीमुळे तसेच बदला घेण्याच्या उद्देशाने पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकल्या…
भरधाव मोटार दुकानाचा दरवाजा तोडून शिरली आत, चार अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

भरधाव मोटार दुकानाचा दरवाजा तोडून शिरली आत, चार अल्पवयीन…

पुणे: भरधाव वेगाने मोटार चालवताना नियंत्रण सुटल्याने मोटार थेट दुकानाचा लोखंडी दरवाजा तोडून आत शिरल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री टिळक रस्त्यावर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *