- December 11, 2025
- No Comment
कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने १५ परवान्यांची प्रक्रिया पार पडल्याची माहिती तपासात मिळाली आहे. संबंधित दलालाने सादर केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
घायवळ टोळीतील गुंडांनी १७ सप्टेंबर रोजी कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात दहशत माजविली. गुंडांनी पिस्तुलातून एकावर पिस्तुलातून गोळीबार केला, तसेच एका तरुणावर कोयत्याने वार केले. याप्रकरणात घायवळ टोळीलील सराइत अजय सरोदे याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती. सराेदे याच्याविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल होते. ही माहिती दडवून त्याने येरवड्यातील पत्ता शस्त्र परवाना मिळवण्यासाठी दिला होता. बनावट रहिवासी पुरावा, तसेच प्रतिज्ञापत्र त्याने सादर केले होते.
शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी त्याने नीलेश फाटक याची मदत घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी दलाल फाटक, तसेच सरोदे याच्याविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणात फाटक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोठडीत त्याची पोलिसांनी चौकशी केली. गेल्या काही वर्षात फाटक याने पंधरा जणांना पिस्तूल परवाना मिळवून दिल्याची माहिती तपासात मिळाली. फाटकने सादर केलेल्या प्रकरणांची पुन्हा चौकशी केली जाणार आहे. परवान्यासाठी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. पंधरा जणांना चौकशीसाठी बोलाविण्यात येणार आहे,’ अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.