• March 10, 2026
  • No Comment

गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    प्रतिनिधी : सचिन गाडे

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली. या प्रकरणात एका हमालाला नागरिकांनी पकडून चांगलाच धडा शिकवला.

    मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती मूळ बिहार राज्यातील असून तो मार्केट यार्ड परिसरात हमालीचे काम करतो. मुलीची छेडछाड करत असताना ही बाब तिच्या वडिलांच्या लक्षात आली. त्यानंतर संतप्त वडिलांसह तेथील नागरिकांनी त्या व्यक्तीला पकडून बेदम मारहाण केली.

    दरम्यान, मार्केट यार्डच्या सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि संबंधित व्यक्तीला मार्केट यार्ड पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

     

    Related post

    पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी मनीषा हरपळे यांची बिनविरोध निवड

    पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी मनीषा हरपळे यांची…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे येथील उपसभापतीपदी मनीषा हरपळे यांची गुरुवारी (दि. 23) बिनविरोध निवड…
    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची देणगी

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची…

    भीमनगर येथील गो-हे खुर्द येथे समाज मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एक प्रेरणादायी घटना घडली आहे. स्थानिक उद्योजक मा. श्री. कालिदास (दादा)…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *