• March 18, 2026
  • No Comment

“समस्या ऐकण्यासाठी रस्त्यावर उतरणारे नगरसेवक; पुण्यातील वेगळा आदर्श”

“समस्या ऐकण्यासाठी रस्त्यावर उतरणारे नगरसेवक; पुण्यातील वेगळा आदर्श”

    पुणे शहरातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या उद्देशाने भाजपचे नगरसेवक सुनील पांडे लोहगावकर यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत ते दर रविवारी सकाळी ८ ते १० या वेळेत साने डेरी भांडारकर रोड येथे तसेच बुधवारी सकाळी ८ ते १० या वेळेत समर्थ पावभाजी, कर्वेनगर येथे नागरिकांसाठी उपलब्ध राहतात.

    या वेळेत परिसरातील नागरिक थेट भेट देऊन आपले प्रश्न, तक्रारी आणि सूचना मांडू शकतात. पाणी, रस्ते, स्वच्छता, वीज, तसेच इतर नागरी सुविधांबाबतचे प्रश्न ते शांतपणे ऐकून संबंधित विभागांशी समन्वय साधून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात.

     

    सध्या बहुतांश लोकप्रतिनिधी नागरिकांपासून दूर राहत असल्याची भावना व्यक्त केली जात असताना, सुनील पांडे लोहगावकर यांचा हा उपक्रम नागरिकांशी थेट संवाद साधणारा आणि विश्वास वाढवणारा ठरत आहे. विशेष म्हणजे, ठराविक ठिकाणी आणि ठराविक वेळेत नागरिकांसाठी उपलब्ध राहणारे ते पुण्यातील एकमेव नगरसेवक असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

    या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, “आमच्या समस्या ऐकण्यासाठी नगरसेवक स्वतः उपस्थित राहतात, ही आमच्यासाठी मोठी दिलासादायक बाब आहे,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. भविष्यात इतर लोकप्रतिनिधींनीही असा आदर्श घेऊन नागरिकांशी थेट संवाद साधावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *