• March 21, 2026
  • No Comment

हडपसरमध्ये ट्रॅफिकची मोठी समस्या; नागरिक अडकले कोंडीत

हडपसरमध्ये ट्रॅफिकची मोठी समस्या; नागरिक अडकले कोंडीत

    प्रतिनिधी : सचिन गाडे

    पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात नेहमी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळते. कार्यालयीन वेळेमुळे रस्त्यांवर वाहनांची संख्या अचानक वाढल्याने प्रमुख मार्गांवर ट्रॅफिक पूर्णपणे विस्कळीत होते.

    विशेषतः सोलापूर रोड, हडपसर गाडीतळ परिसर आणि प्रमुख चौकांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. काही ठिकाणी सिग्नल व्यवस्थापनातील अडचणी आणि सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली.

    वाहनचालकांना काही ठिकाणी 20 ते 30 मिनिटे एका जागीच थांबून राहावे लागते. यामुळे ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना उशीर होत असतो.

    वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ट्रॅफिक सुरळीत करण्याचा प्रयत्न देखील करतात, मात्र वाहनांची संख्या जास्त असल्याने कोंडी लगेच कमी झाली होत नाही.

    प्रशासनाने नागरिकांना गर्दीच्या वेळेत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *