• July 1, 2026
  • No Comment

आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महा-ई-सेवा केंद्र चालक, ऑपरेटर व आधार सेवा केंद्र प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शासनाकडे प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करण्याची मागणी केली.

    आंदोलनादरम्यान संघटनेने नवीन महा-ई-सेवा केंद्रांना परवानगी देणे तात्काळ बंद करावे, शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या महा-ई-सेवा केंद्रांच्या आयडी रद्द कराव्यात, तसेच महासारथी पोर्टल बंद करण्यात यावे,

    यासोबतच महा-ई-सेवा केंद्रांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवांच्या शुल्क दरात वाढ करावी, आधार मशीनचे तसेच MahaOnline चे प्रलंबित कमिशन त्वरित जमा करावे, व्हॉट्सअॅपद्वारे दाखले देण्याची पद्धत बंद करावी आणि सर्व शासकीय पोर्टल सुरळीत सुरू ठेवावीत व महाऑनलाईन मध्ये अनेक सर्विसेस आहेत त्या त्वरित चालू करण्यात याव्या, अशीही मागणी करण्यात आली.

     

    याशिवाय महा-ई-सेवा केंद्र चालक यांना निमशासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची महत्त्वाची मागणी संघटनेने शासनासमोर मांडली.

    “राज्यातील हजारो महा-ई-सेवा केंद्र चालक नागरिकांना शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

     

    प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *