• May 8, 2026
  • No Comment

स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे.

    गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस कर्मचारी संदीप शिर्के, विशाल दळवी आणि ऋषीकेश व्यवहारे हे परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तडीपार आरोपी शाबीर शेख हा अथर कंपनीसमोर डायस प्लॉट परिसरातील फुटपाथवर थांबलेला आहे.

    माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या गुन्हे अभिलेखांची तपासणी केली असता त्याच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात जुगार कायद्यांतर्गत तब्बल १२ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.

    पोलीस उपआयुक्त, झोन २, पुणे शहर यांनी त्याला दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. मात्र तडीपार आदेशाचे उल्लंघन करून तो पुणे शहरात वावरत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११९/२०२६ नुसार महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला स्वारगेट पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) श्री. शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ तसेच संदीप शिर्के, विशाल दळवी, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, ऋषीकेश व्यवहारे आणि सद्दाम तांबोळी यांच्या पथकाने केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला; दोघे अटकेत

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : वैमनस्यातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केल्याची घटना हडपसर परिसरातील रामटेकडी येथे घडली आहे. या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *