• May 25, 2026
  • No Comment

पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे धोकादायक असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव कर्मचाऱ्यांनी त्यांना त्या बाजूला जाऊ नका, अशी विनंती केली.

     

    मात्र एवढ्यावरून संबंधित व्यक्ती संतापल्याचे सांगितले जात आहे. “मी कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का?” असे म्हणत त्याने कर्मचाऱ्यांशी अरेरावी सुरू केली. त्यानंतर त्याने मोबाईल काढून शूटिंग करण्यास सुरुवात केली व “हे हॉटेल बंद करून दाखवतो,” अशा शब्दांत धमक्या दिल्या.

     

    हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी शांतपणे “आमच्यासाठी सर्व ग्राहक सारखेच आहेत,” असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित व्यक्ती सतत मोठमोठ्याने बोलत राहिल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारामुळे इतर ग्राहकांनीही नाराजी व्यक्त केली.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *