तीर्थक्षेत्र आळंदी येथे माउलींच्या समाधीवर आज,शिंदे सरकार साज साकारण्यात आला

    तीर्थक्षेत्र आळंदी येथे माउलींच्या समाधीवर आज,शिंदे सरकार साज साकारण्यात आला

    पुणे: डोक्यावर शिंदे शाही पगडी, अंगात भरजरी पिवळा सदरा, कंबरेला लाल पितांबर आणि चेहऱ्यावर पिळदार मिशी असा मराठमोळा शिंदे शाही साज देऊन संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर मराठा साम्राज्याचे महान सेनानी महादजी शिंदे यांचे रूप आज साकारण्यात आले होते. पुणे येथील शिल्पकार अभिजित घोंडफळे यांनी ही उटी साकारली होती.

    संत श्री.ज्ञानेश्वर महाराज मंदिर व पालखी सोहळ्यात महादजी शिंदे यांचे मोठे योगदान असून, त्याकाळी संस्थानला शिंदे यांचा राजाश्रय लाभला होता. मंदिरातील विविध बांधकामे शिंदे यांनी बांधलेली असून, त्यांचे योगदान अनन्यसाधारण असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून श्रीराम नवमीला मंदिरात प्रथा-परंपरेनुसार त्यांचे चंदन उटीतून रूप साकारण्यात येते.

    अखंड हिंदुस्थानात महादजी बाबा असे एकमेव महापुरुष ज्यांची चंदनउटीत रूप साकारले जाते. तसेच मंदिराच्या प्रारंगणात श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व श्रीमंत शिंदे सरकार ट्रस्ट तर्फे आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

    यावेळी श्रीमंत शिंदे सरकार घराणे व श्रीमंत शिंदे सरकार ट्रस्ट व नागरिक मोठ्या संख्येने तीर्थक्षेत्र आळंदी येथे साज पाहण्यासाठी उपस्थित होते

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *