• June 29, 2023
  • No Comment

तरुणींवरील हल्ल्यांना जरब बसवा! भाजपाच्या शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांना मागणी

तरुणींवरील हल्ल्यांना जरब बसवा! भाजपाच्या शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांना मागणी

पुणे: सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या कोयत्या हल्ल्याच्या आणि इतर घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेत गुन्हेगारी रोखण्यासाठी कृती आराखडा करण्याची मागणी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली आहे. शिवाय पुणे पोलीस आयुक्त हद्दीत प्रस्तावित नव्या सात पोलीस स्टेशनच्या निर्मितीबाबत पाठपुरावा करण्याचा निर्णयही या भेटीदरम्यान झाला.

भाजपाच्या शिष्टमंडळात प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, हेमंत रासने, धीरज घाटे, अजय खेडेकर, दीपक नागपुरे, अमोल कविटकर, पुनीत जोशी, दीपक पोटे, संदीप लोकर, बापू मानकर आदी उपस्थित होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आले.

गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक बसावा यासाठी कडक कलमे लावून जास्तीत जास्त शिक्षा आरोपींना होईल, या दृष्टीने पोलीसांनी खटला न्यायालयीन पातळीवर मांडावा या मागणीसह कोचिंग क्लासेस आणि शैक्षणिक संकुलात तक्रार पेटी बसविणे, दुचाकीवरील मार्शलची संख्या वाढवून गस्त वाढविणे, गरज पडल्यास गणेश मंडळ कार्यकर्त्यांना सामावून घेणे, बंद असलेल्या पोलीस चौकी पुन्हा सुरु करणे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *