• June 29, 2023
  • No Comment

संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीची मोठी मागणी

संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीची मोठी मागणी

    शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह प्रविण राऊत यांच्यावर गोरेगाव येथील पत्रा चाळमधील रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) उपस्थित संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाला केली होती.

    दरम्यान संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी याचिकेवरील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. ईडीच्या याचिकेवरील सुनावणी आता 11 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

    संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हाय कोर्टात धाव घेतली होती. संजय राऊत, प्रविण राऊत यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी ईडीने केली होती.

    काय आहे प्रकरण?

    2010 मध्ये, प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीतील 25 टक्के हिस्सा एचडीआयएलला विकला. त्यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी बिल्डरांना विकण्यात आले. प्रवीण राऊत यांना एचडीआयएल समूहाकडून 112 कोटी रुपये मिळाले होते, त्यापैकी 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर पाठवण्यात आले होते.

    पत्रा चाळमधील रहिवाशांची घरे पाडून त्यांना बेघर करण्यात आले. त्यांना वेळेवर सदनिका देण्यात आल्या नाहीत. बिल्डरांनी भाडेकरूंना भाडे देणेही बंद केले, अस आरोप ईडीने केला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *