• June 28, 2023
  • No Comment

विनापरवाना बांधकाम एंजल हायस्कूलला नोटीस

विनापरवाना बांधकाम एंजल हायस्कूलला नोटीस

    लोणी काळभोर : अतिक्रमण करून बांधकाम
    विनापरवाना केल्याप्रकरणी येथील ऐंजल कदमवाकवस्ती
    हायस्कूलला ग्रामपंचायतीने नोटीस बजावली आहे. शाळा प्रशासनाने तरीही काम सुरूच ठेवले असून, यासंदर्भात शाळा प्रशासनाला विचारले असता टोलवाटोलवी केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच शाळेत फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयात बसवून ठेवले होते. त्यावेळी पालकांनी शाळा व्यवस्थापनाने अरेरावीही केली होती.
    कदमवाकवस्ती हद्दीमध्ये सर्व्हे नं./ गट क्रमांक २५५ मध्ये असणारी जागा ही पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण पुणे यांनी प्रसिद्धी केलेल्या विकास आराखड्यात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व कॉलेजसाठी आरक्षित केली आहे. त्या ठिकाणी ऐंजल हायस्कूल यांनी विनापरवाना अतिक्रमण करून बांधकाम सुरू केलेले आहे.

    त्यासंदर्भात हे बांधकात थांबवून त्वरित पाडण्याची ग्रामपंचायतीने शाळेला दिली आहे. नोटीस मिळूनही शाळेने कोणताही खुलासा न करता बांधकाम सुरू ठेवले आहे. याविषयी शाळा प्रशासनाला विचारले असते शाळा प्रशासन टोलवाटोलवी केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *