• May 7, 2023
  • No Comment

परिचारिकेची विषारी औषधाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या

परिचारिकेची विषारी औषधाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या

    खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेने विषारी औषधाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रियकराने मोटार घेण्यासाठी परिचारिक युवतीकडे पैशांची मागणी तसेच मारहाण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिसांनी प्रियकराच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

    अश्विनी देवीदास राठोड (वय २१, रा. धानोरी) असे आत्महत्या केलेल्या परिचारिक युवतीचे नाव आहे. या प्रकरणी प्रियकर बापू किसन मैद (वय २२, रा. छत्रपती संभाजीनगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अश्विनीचे वडील देवीदास राठोड (वय ५४, रा. चिखलठाणा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किसन मैद आणि अश्विनी राठोड यांनी कन्नड येथील एका संस्थेतून परिचारिक अभ्यासक्रम पूर्ण केला होता. दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघे जण पुण्यात नोकरीसाठी आले. अश्विनी लोहगाव भागातील एका खासगी रुग्णालयात परिचारिका होती. किसनने तिच्याकडे नवीन दुचाकी घेण्यासाठी पैशांची मागणी केली होती. अश्विनीने नकार दिल्यानंतर त्याने तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. तो तिला शिवीगाळ करुन त्रास देता. किसनच्या त्रासामुळे अश्विनीने विषारी औषधांची इंजेक्शन टोचून घेतले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अश्विनीचा प्रियकर किसन याच्या त्रासामुळे तिने आत्महत्या केल्याचे वडील देवीदास राठोड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर या प्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक साळवी तपास करत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *