• December 3, 2022
  • No Comment

पुण्यात मुलाची मैत्रीसाठी जबरदस्ती, बारावीतील मुलीची आत्महत्या

पुण्यात मुलाची मैत्रीसाठी जबरदस्ती, बारावीतील मुलीची आत्महत्या

    पुणे : मैत्री करण्यासाठी जबरदस्ती करत वेळोवेळी पाठलाग करून त्रास दिल्याने बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 12 ऑक्टोबर रोजी विमानतळ परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी या तरुणीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याप्रकरणी अधिक माहिती अशी की, चंदन नगर येथील केंद्रीय महाविद्यालयात मयत तरुणी बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिच्याच वर्गात 17 वर्षीय आरोपी देखील शिक्षण घेत होता. दरम्यान या तरुणीच्या शाळेत जाण्या येण्याच्या रस्त्यावर आरोपी वेळोवेळी तिचा पाठलाग करत होता. सोबत मैत्री करावी यासाठी जबरदस्ती करून तो तिला त्रास देत होता. या सर्वाला कंटाळून या तरुणीने विमानतळ परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.


    सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र तपासा दरम्यान हा सर्व प्रकार उघडकीस आला. विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *