• December 2, 2022
  • No Comment

मुंढवा पोलीसांनी तडीपार इसमास हत्यारासह केली अटक

मुंढवा पोलीसांनी तडीपार इसमास हत्यारासह केली अटक

    मुंढवा पोलीस ठाणे तपास पथकाला बातमीदार मार्फत खात्रीशीर
    बातमी मिळाली की तडीपार इसम नामे सागर शंकर घोडके, वय २२ वर्षे, रा. किर्तनेबाग
    लोणकरवस्ती,केशवनगर, मुंढवा, पुणे हा मुंढवा चौक कडुन मगरपट्टाकडे जाणा-या मुख्य रस्त्याच्या ब्रीज
    खाली, मुंढवा, पुणे येथे हत्यारासह फिरत आहे. लागलीच तपास पथकाने मुंढवा पोलीस ठाणे प्रभारी श्री.अजित
    लकडे यांचे मार्गदर्शनाखाली सदर आरोपीस हत्यारासह ताब्यात घेतले आहे.


    सदर तडीपार आरोपी नामे सागर घोडके यास मा. पोलीस उप-आयुक्त, परि. ५, पुणे यांचेकडील तडीपार
    आदेश क्र.१६/२०२१ दि.१८/०४/२०२२ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(अ)(ब) प्रमाणे पुणे शहर, पिंपरी
    चिंचवड आयुक्तालय व जिल्हयातुन दोन वर्षा करिता तडीपार केलेला असताना तसेच मा.पोलीस उप आयुक्त,
    विशेष शाखा, पुणे शहर यांचे कडील आदेश क्रमांक जा.क्र / पोउआ / विशा/पुणे शहर / ११२०१/२०२२
    दि.२८/११/२०२२ अन्वये दि. २९/११/२०२२ रोजीचे ००/०१ ते दि. १२/१२/२०२२ रोजीचे २४/०० वा. चे दरम्यान
    महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे घातक शस्त्रे बरोबर
    नेणेस/बाळगण्यास बंदी आदेश असताना सदर आदेशाचा भंग करुन विनापरवाना, बेकायदेशिर, अनधिकृतपणे
    वरिल वर्णनाचा कोयता स्वतः जवळ बाळगलेले अवस्थेत वरील ठिकाणी मिळून आला म्हणुन सागर शंकर घोडके
    याचे विरुध्द मुंढवा पोलीस ठाणे गुर नं ३२१/२२ आर्म अॅक्ट कलम ४ सह २५ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम
    १४२, ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    सदरची कामगीरी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर
    संदिप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर श्री नामदेव चव्हाण, मा. पोलीस उप-
    आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर श्री
    बजरंग देसाई,यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंढवा पोलीस ठाणे पुणे श्री अजित लकडे, पोलीस
    निरीक्षक (गुन्हे) प्रदिप काकडे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, संदिप जोरे, पोलीस अंमलदार दिनेश राणे,
    संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे, राजु कदम, महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे, योगेश गायकवाड, सचिन पाटील
    यांनी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *