हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी दुर्घटना टळली रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी दुर्घटना टळली रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

    लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कृष्णा लॉजजवळील ‘अमित बिर्याणी’ हॉटेलमध्ये मंगळवारी (दि.१७) रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन हॉटेल आगीत पूर्णपणे खाक झाले. गॅस गळतीमुळे ही दुर्घटना घडली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

     

    पुणे सोलापूर महामार्गांवर संभाजीनगर परिसरात अमित बिर्याणी हॉटेल आहे. मंगळवारी रात्री हॉटेलच्या किचनमध्ये सिलेंडर गळती होऊन मोठी आग लागली. या आगीने भयंकार रूप धारण केले होते हॉटेल मधील गिऱ्हाईक व कर्मचारी यांनी त्वरित बाहेर पळ काढून आरडाओरडा केल्यावर आजूबाजूच्या व्यवसायिकांनी आपआपले दुकानें व हॉटेल बंद केली व आग विजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी हॉटेलमध्ये दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका झाला. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर परिसरात आग विजविण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने आग विजविण्यासाठी हडपसर, वाघोली व वानवडी विभागातून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावल्या.त्यांना पोहचायला अर्धा तास वेळ लागला त्या आल्यानंतर आग आटोक्यात आली परंतु आगीत हॉटेल मधील सर्व फर्निचर, साहित्य जळून खाक झाले. लोणी काळभोर पोलिसांनी देखील त्वरित पोहचून आग विजविण्याचा प्रयत्न केला.

    पूर्व हवेली मधील सर्व हॉटेलचे ऑडिट होणे व त्या हॉटेलचे व्यवसाय परवाने, आहेत की नाहीत, अण्णा औषध फूड ड्रग्स ऑफिसरने, अशा सर्व हॉटेलची तपासणी करून ऑडिट करणे गरजेचे आहे, असे स्थानिक घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सांगितले.

    लोणी काळभोर, कदमवाकवस्ती या परिसरात लोकसंख्या मोठी असून अग्निशमन विभाग हडपसर येथे असून मोठी आग लागण्यावर त्यांना येण्यासाठी अर्धा ते एक तास लागतो त्यामुळे या परिसरासाठी अग्निशमन दलाची व्यवस्था व्हावी अशी मागणी होत आहे.

     

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *