• November 18, 2022
  • No Comment

बायकोसह सासरच्या लोकांच्या त्रासातून; जावयाची गळफास घेऊन आत्महत्या

बायकोसह सासरच्या लोकांच्या त्रासातून; जावयाची गळफास घेऊन आत्महत्या

     

    खडकी: पत्नी आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून एका 38 वर्षीय व्यक्तीने आयुष्य संपवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याच्या खडकी परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी या व्यक्तीच्या पत्नीसह सासू-सासरे आणि मामा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    समीर निवृत्ती नाईक (वय 38) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. समीर यांचे वडील निवृत्ती भगवंत नाईक (वय 65) यांनी खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्यादी दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरची पत्नी आणि त्याच्या सासरकडची लोक त्याच्याकडे वारंवार पैशाची मागणी करत होते. समीरने पत्नीला दहा लाख रुपये दिले होते. मात्र, आणखी पैसे देण्यात यावेत या मागणीसाठी त्याचा मानसिक छळ सुरू होता. याच त्रासाला कंटाळून समीरने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. मात्र, समीरच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *