• November 18, 2022
  • No Comment

अल्पवयीन मुलांनी केला गुंड मोन्या जाधवचा खून तिन टाळकी जेरबंद

अल्पवयीन मुलांनी केला गुंड मोन्या जाधवचा खून तिन टाळकी जेरबंद

     

    कोंढवा: पुण्यातील कोंढवा परिसरात दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री खुन झाला होता. सराईत गुन्हेगार मोन्या जाधव याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता.

    मोन्या जाधव मध्यरात्रीच्या सुमारास कोंढवा परिसरातून जात असताना त्याची दुचाकी अडवून त्याचा खून करण्यात आला होता. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत.

    तोहीद समीर शेख (वय 22) त्याच्यासह दोन अल्पवयीन आरोपींनी मोन्या जाधव याचा खून केला. तोहीद शेख याला अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोन्या जाधव हा सराईत गुन्हेगार आहे. त्याचे आणि आरोपींचे पूर्वीपासूनच वाद होते. त्यामुळे मोन्या जाधव हा आरोपींना एकट्या दुखट्याला गाठून शिवीगाळ आणि मारहाण करायचा. त्यामुळेच आरोपींनी त्याला एकट्याला गाठले आणि कोयत्याने वार करून त्याचा खून केला.

    दरम्यान, खून केल्यानंतर आरोपी इतर राज्यात पळून जाण्याच्या तयारीत होते. डेक्कन परिसरातील झेड ब्रिज खाली ते जाऊन थांबले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने सापळा रचून आरोपींना अटक केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *