• November 18, 2022
  • No Comment

पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या पोलिसालाच मारहाण

पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या पोलिसालाच मारहाण

     

    वारजे माळवाडी: भर रस्त्यात पती-पत्नीचे भांडण सुरू असताना मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणे होम कॉलनीत हा प्रकार घडला. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याप्रकरणी पोलीस नाईक सागर जगताप यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गोविंद नागनाथ सुरवसे (वय 35, रा. मुर्टा नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) याला अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गोविंद सुरवसे याचे पत्नीसोबत घटस्फोटाच्या कारणावरुन हिंगणे होम कॉलनीतील सार्वजनिक रोडवर भांडण सुरु होते. रात्री सार्वजनिक रस्त्यावर भांडण सुरू असल्याने नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्यानुसार सागर जगताप व पोलीस शिपाई चव्हाण हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी गोविंद सुरवसे याला समजावून सांगितले. पण, त्याने सागर यांची कॉलर पकडून त्यांना ढकलून देऊन हाताने मारहाण करत मोठमोठ्याने शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
    त्यानंतर पोलिसांनी त्याला मोटारसायकलवरुन बसवून पोलीस चौकीत नेण्याचा प्रयत्न केला. तर, त्याने दुचाकीला लाथा मारुन शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा आणला. अधिक तपास उपनिरीक्षक सावंत करीत आहेत.

    Related post

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची देणगी

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची…

    भीमनगर येथील गो-हे खुर्द येथे समाज मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एक प्रेरणादायी घटना घडली आहे. स्थानिक उद्योजक मा. श्री. कालिदास (दादा)…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *