• April 18, 2026
  • No Comment

गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    प्रतिनिधी : सचिन गाडे

    पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याबाबत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. तानाजी मांगले यांनी दिली.

    या प्रक्रियेदरम्यान सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष धारणे उपस्थित होते. प्रारूप मतदार यादी ९ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर आलेल्या आक्षेपांनंतर संबंधित हरकतींवर सुनावणी घेऊन अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे.

    या निवडणुकीत ३ मतदारांना संस्थेची वर्गणी न भरल्यामुळे अपात्र ठरविण्यात आले आहे. १५ एप्रिलपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *