• November 18, 2022
  • No Comment

लोणी काळभोर परिसरात सध्या युवकांमध्ये शिक्षणापेक्षा गुन्हेगारी अनैतिक गोष्टींकडे जास्त कल

लोणी काळभोर परिसरात सध्या युवकांमध्ये शिक्षणापेक्षा गुन्हेगारी अनैतिक गोष्टींकडे जास्त कल

    लोणी काळभोर : पूर्व हवेलीतील परिसरात सध्या युवकांमध्ये शिक्षणापेक्षा गुन्हेगारी, अवैध व्यवसाय, जुगार, अमली पदार्थाचे सेवन अश्या अनेक अनैतिक गोष्टींकडे जास्त कल  दिसू लागला आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक पोलीस प्रसाशन कमी पडते कीं काय अशी चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहेत. या युवकांचे समुपदेशन  करणे महत्वाचे आहे.

    काही दिवसापूर्वी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच एक अनधिकृत जुगार अड्ड्यावर काही युवकांनी कोयत्याचा धाक दाखवून रक्कम लुटल्याची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात झाली त्यातच दोन दिवसापूर्वी गस्त घालणाऱ्या पोलिसांना दोन युवकांकडून दगडाने मारहाण झाली. या घटनांनंतर स्थानिक पोलीस प्रसाशानाचा गुन्हेगारी, जुगार व इतर अनधिकृत व्यवसाय करण्यावर वचक राहिला नाही कीं काय अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.परिसरातील शाळा, कॉलेजबाहेर देखील रोडरोमिओ टवाळखोर युवक आपल्या बुलेटच्या सायलेंसर ने फटाके उडवत गाड्या वेगाने पळवतात यातील बहुतांश मुले अल्पवयीन आहेत. एका दुचाकीवर तिघेजण बसून कसलाही वाहन परवाना जवळ नसताना जीवघेण्या वेगाने गाड्या पळवत आहेत. यामुळे शाळा व कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्गाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

    याबाबत लवकरात लवकर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.परिसरात सुरु असलेल्या जुगार,मटका या अवैध व्यवसायामुळे युवा पिढी बरबाद होत असून कर्जबाजारी होत आहेत तसेच या सर्व अवैध धंद्याबरोबरच खासगी सावकार देखील मागे राहिलेले नाहीत.दहा टक्के व्याजाच्या दराने पैसे देऊन लोकांकडून जमिनी, गाड्या व इतर मालमत्ता गैर पद्धतीने गहाण ठेवली जात आहेत. असे अनेक अवैध व्यावसायांनी पूर्व हवेलीत आपले तोंड उघडले असून यावर लवकर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *