- November 17, 2022
- No Comment
महत्त्वाची बातमी! तुमच्या आधार कार्डवर किती नंबरची नोंद आहे? पहा सविस्तर
आधार कार्ड हे कोणत्याही ठिकाणी पत्त्याचा किंवा इतर गोष्टींचा पुरावा सादर करण्यासाठी विश्वासार्ह कागदपत्र मानले जाते. आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. बँक अकाउंट पासून इतर महत्वाचे व्यवहार करताना आधार कार्डची गरज भासते.
आपण अनेकदा आधार कार्डचे झेरॉक्स किंवा आधार कार्ड पुरावा म्हणून सादर करतो, त्यावेळी समोरच्या व्यक्तीकडे तुमच्या आधार कार्डची माहिती जमा होते. अशावेळी तुमच्या आधार कार्डचा चुकीचा वापर होऊ शकतो. किंवा तुमच्या आधार कार्डचा वापर करून कोणीही सिम कार्ड विकत घेऊ शकते. त्यामुळे अशा गोष्टींपासून सावध करण्यासाठी सरकारने एक पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल ‘डिपार्टमेंट ऑफ टेली कम्युनिकेशन’कडून (TAFCOP) लाँच करण्यात आले आहे.
या स्टेप्स वापरुन आधार कार्डवर किती सिम कार्ड्सची नोंद आहे जाणून घ्या
TAFCOP ची अधिकृत वेबसाईट tafcop.dgtelecom.gov.in उघडा
त्यांनंतर तिथे मोबाईल नंबर विचारण्यात आलेल्या पर्यायामध्ये तो देऊन OTP पाठवण्याचा पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला मिळालेला OTP सेंड करा.
यानंतर तुमच्या समोर तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड्सची नोंद आहे, त्याची यादी दिसेल.