• November 17, 2022
  • No Comment

दुहेरी खूनातील आरोपी गजाआड, येरवडा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

दुहेरी खूनातील आरोपी गजाआड, येरवडा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

     

    येरवडा: येरवडा येथील लमाण वस्तीत शनिवारी (दि.12) पहाटे निर्घृणपणे दुहेरी खून करणाऱ्या नऊ आरोपीं व एका अल्पवयीन मुलाला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    शंकर मानु चव्हाण (वय 54), बादल शंकर चव्हाण (वय 25), शिवशंकर अंजनकुमार हरगुडे (वय 20),साहिल राम कांबळे (वय 20),कृष्णा राजू पवार (वय23), निशांत तायाप्पा चलवादी (वय 20), रोहित परशुराम सणके (वय 21), गौरव उर्फ साहिल रवी चव्हाण (वय 20), सोनू शंकर राठोड (वय 23) व एक अल्पवयीन मुलगा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणातून अनिल उर्फ पोपट भीमराव वालेकर (वय 35) आणि सुभाष उर्फ पापा किसन राठोड (41) या दोघांचा आरोपींनी तलवार व पालघन यांनी वार करत निर्घृण खून केला होता. मयत हे देखील सराईत गुन्हेगार होते. पोलिसांनी तपासा मध्ये शंकर व त्याचा मुलगा बादल यांना पहिल्यांदा ताब्यात घेतले व इतर आरोपींना पुन्हा अटक केले. पोलीस तपासात आरोपींनी गुन्हा कबूल केला असून ते सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत.चा पुढील तपास येरवडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *