• November 22, 2022
  • No Comment

सेक्सटॉर्शनमधील आरोपी राजस्थानमधुन जेरबंद, दत्तवाडी पोलीसांची कामगिरी

सेक्सटॉर्शनमधील आरोपी राजस्थानमधुन जेरबंद, दत्तवाडी पोलीसांची कामगिरी

     

    पुणे: सेक्सटॉरशसन गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात गेलेल्या पुणे पोलिसांवर दगडफेक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र पोलिसांनी जीवावर उदार होऊन पाठलाग करत आरोपीला पकडले.

    अन्वर सुभान खान (वय 29, गुरूगोठडी, लक्ष्मणगढ, अलवर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. तांत्रिक विश्लेषण करत आणि लोकेशन द्वारे शोध घेऊन दत्तवाडी पोलिसांनी त्याला जेरबंद केले.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्सटॉर्शनमुळे पुण्यातील धनकवडी परिसरात एका 19 वर्षे तरुणाने आत्महत्या केली होती. अर्ध नग्न अवस्थेतील फोटो काढून त्याला ब्लॅकमेल केले जात होते. याला कंटाळून त्याने दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. दत्तवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना येथील आरोपी राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली होती.

    आरोपीला पकडण्यासाठी दत्तवाडी पोलिसांचे एक पथक राजस्थानला गेलेही होते. आरोपी अन्वर खान याला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस जात असताना त्याच्या नातेवाईकांनी व गावातील लोकांनी विरोध केला. पोलिसांवर दगडफेक करत त्याला पळून जाण्यास मदत केली. मात्र तरीही पोलिसांनी पाठलाग करत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत राजस्थानच्या त्या गावातील अनेक मुले आणि महिला अशा प्रकारे ऑनलाईन सेक्सटोर्शनचे प्रशिक्षण घेऊन खंडणी उकळत असल्याचे समोर आले आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *