• November 22, 2022
  • No Comment

प्रियकराच्या पत्नीचा खून, एकवीस वर्षीय प्रेयसी जेरबंद

प्रियकराच्या पत्नीचा खून, एकवीस वर्षीय प्रेयसी जेरबंद

     

    खेड: प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या प्रियकराच्या पत्नीचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी 21 वर्षीय प्रेयसीला गजाआड केले आहे.

    कोमल गणेश केदारी (वय 28) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी स्वाती सुभाष रेगडे (वय 21) या तरुणीला अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कोमल हिचा पती गणेश केदारी आणि स्वाती रेगडे या दोघांचे अनैतिक संबंध होते. या दोघांमध्ये कोमल वरून अनेकदा भांडण होत होती. याचा राग स्वाती रेगडे या महिलेच्या मनात होता. गणेश केदारी कंपनीत कामाला गेला असता आरोपी स्वाती हिने घरात एकट्या असलेल्या कोमलचा गळा आवळून खून केला होता.

    दरम्यान सुरुवातीला खेड पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात खून केल्याचा गुन्हा दाखल होता. संशोधन अहवालात गळा आवळून कोमलचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयित महिला स्वाती रेंगडे हिला जुन्नर मधून ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेला अधिक चौकशीत तिने खून केल्याची कबूल दिले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *