• November 22, 2022
  • No Comment

तेरा दुचाकीसह सराईताला केले जेरबंद, दरोडा व वाहनचोरी पथकाची कामगिरी

तेरा दुचाकीसह सराईताला केले जेरबंद, दरोडा व वाहनचोरी पथकाची कामगिरी

     

    पुणे: पुणे पोलिसांच्या दरोडा विरोधी वाहनचोरी विरोधी गुन्हे पथकाने एका सराईताला 13 दुचाकी सह अटक केले आहे.दिपक गोरख डाडर (वय 25 रा. अहमदनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा विरोधी पथकातील पोलीस खडकी परिसरात तपास करत असताना पोलीस नाईक रविंद्र लोखंडे व पोलीस अमंलदार शिवाजी सातपुते यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक तरुण मालधक्काकडे जाणाऱ्या रोडवर निळ्या रंगाच्या मोपेड वर बसला असून त्याच्याजवळची दुचाकीही चोरीची आहे. पोलिसांनी तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातील उडवा-उडवीची उत्तरे दिली. गाडीची कागदपत्रे मागितली असता ते त्याच्याकडे नव्हती त्याने अखेर गाडी चोरल्याचे कबुल केले.

    त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशीकेली असता त्याने साथीदरांसह गाड्या चोरल्याचे कबुल केले. पोलीस तपासात त्याच्यावरील खडक, दत्तवाडी, कोंढवा, डेक्कन, फरसखाना, वानवडी, शिवाजीनगर, बिबेवाडी, निगडी, पारगाव, उल्हासनगर या पोलीस ठाण्यात दाखल असलेले दुचाकी चोरीचे 13 गुन्हे उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेल्या पुणे शहरातील 10 व बाहेरील 3 अशा 3 लाख 35 हजार रुपयांच्या 13 वहाने जप्त केली आहेत. याचा पुढील तपास दरोडा व वहानचोरी विरोधी पथक एक चे पोलीस उपनिरीक्षक एस.वाय. शेख करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *