• November 22, 2022
  • No Comment

तडीपारी संपलेल्या सराईत गुंडावर कोयताने हल्ला करत केला खून

तडीपारी संपलेल्या सराईत गुंडावर कोयताने हल्ला करत केला खून

     

    चाकण: तडीपारी संपलेल्या गुन्हेगारावर 8 ते 10 जणांच्या टोळक्याने कोयताने हल्ला करून केला खून, मित्र किरकोळ जखमी

    या प्रकरणात मोनेश घोगरे, वय 21 वर्षे, रा. खंडोबा माळ, चाकण या तडीपारी संपलेल्या गुन्हेगाराचा मृत्यू झाला आहे. त्याचा मित्र अमोल लाटुकर हा किरकोळ जखमी झाला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत गुन्हेगार मोनीश घोगरे ह्याला 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. त्याची तडिपारी दीड महिन्यापूर्वी संपलेली होती. तो काल रात्री 11 वा त्याच्या मित्रासोबत घरी जात असताना चाकण मार्केट येथे 8 ते 10 जणांनी कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला.’

    ते पुढे म्हणाले की, घोगरे च्या डोक्यावर व इतर ठिकाणी शरीरावर वार झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्याच्या मित्राच्या पाठीत व मानेवर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. त्याच्यावर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *