• November 22, 2022
  • No Comment

महिला पोलिसासोबत गैरवर्तन करणारी दोन टोळीकी गजाआड

महिला पोलिसासोबत गैरवर्तन करणारी दोन टोळीकी गजाआड

     

    दिघी: कर्तव्यावर असताना महिला पोलिसासोबत गैरवर्तन करून विनयभंग करणाऱ्या दोघांना दिघी पोलिसांनी अटक केली आह. ही घटना देहूफाटा चौक आळंदी येथे घडली.

    भूषण मनोज जैन (वय 30, रा. घोलपवस्ती, आळंदी), दत्तात्रय रामा कोकरे (वय 23, रा. गोलेगाव, ता. खेड) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी 40 वर्षीय पोलीस कर्मचारी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूफाटा चौकातून आळंदी बाजूला संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता यात्रेच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आला होता. कोणत्याही वाहनांना त्या रस्त्याने जाण्यास बंदी घालण्यात आली असता आरोपी त्यांची दुचाकी त्या रस्त्याने घेऊन जात होते. त्यामुळे तिथे कर्तव्यावर असलेल्या फिर्यादी पोलीस कर्मचारी महिलेने दोघांना अडवले. त्यावरून आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करून फिर्यादी सोबत गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ करून दमदाटी केली. एक पोलीस अंमलदार हा वाद सोडवत असताना आरोपींनी त्यांना मारहाण करून जखमी केले. पोलिसांना मारहाण करून पळून जाणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *