- November 22, 2022
- No Comment
पैशाच्या वादातुन तरुणाचा खून, दोन आरोपी गजाआड
पुणे: भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बेटिंगसाठी घेतलेले पैसे परत न दिल्याने दोन सराईत गुन्हेगारांनी एका तरुणाचा खून केला.
सात दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

निखिल उर्फ संकेत चंद्रशेखर अनभुले (वय 32) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विशाल अमराळे (वय 35) आणि लहू माने (वय 40) या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. हर्षदा निखिल अनभुले (वय 24) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत निखिल याने आरोपींकडून बेटिंग करण्यासाठी काही पैसे घेतले होते. हे पैसे परत करावे यासाठी आरोपी त्याला फोन करून सातत्याने धमक्या देत होते. 15 नोव्हेंबर रोजी आरोपींनी त्याला भारतीय विद्यापीठ परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर कोंडून ठेवत त्याला बेदम मारहाण केली. डोक्यावर आणि छातीवर गंभीर जखम झाल्याने निखिल याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत दोघाही आरोपींना अटक केली आहे.