• December 4, 2022
  • No Comment

बावधनातील गोल्डन क्राऊन लॉजमधील ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश

बावधनातील गोल्डन क्राऊन लॉजमधील ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश

    महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी ही कारवाई बावधन येथील भूगावरोडवर असलेल्या गोल्डन क्राऊन लॉजवर गुरुवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास केली.
    प्रकाश मनबहादूर क्षैंत्री (वय 30, रा. बावधन, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक महेश नारायण वायबसे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी प्रकाश याच्यावर आयपीसी 370 (3), अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    बावधन येथील भूगावरोडवर असलेल्या गोल्डन क्राऊन लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
    त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी लॉजवर छापा टकून आरोपीला अटक केली.
    आरोपी प्रकाश महिलांना जास्तीचे पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत होता.
    यातून मिळणाऱ्या पैशांतून तो आपली उपजीविका भागवत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख करीत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *