- May 15, 2023
- No Comment
लोणीकंद पोलीसांनी खुनाचे गुन्हयातील आरोपींना कौशल्यपुर्ण तपास करुन २४ तासात ठोकल्या बेडया

लोणीकंद पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व स्टाफ रोहन अभिलाषा सोसायटी जवळ, मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी तिवारी यांचे मौजे वाघोली गट नंबर ५११ या मिळकतीकडे जाणा-या कच्च्या रोडवर, वाघोली, पुणे या ठिकाणी एक पुरुष जातीचे अंदाजे ३० ते ३५ वय असणारा इसम बेशुध्द व रक्ताचे थारोळ्यात जखमी अवस्थेत दिसुन आला होता. त्यावेळी सदरचा इसमाचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणास्तव गळयावर कोणत्यातरी धारधार
हत्याराने वार करुन जिवे ठार मारले असल्याचे समजुन आले. नमुद घटनास्थळी एक दुचाकी देखिल मिळुन आल्याने पोलीसांनी दुचाकी वरील नंबरची माहिती प्राप्त करुन तसेच तांत्रिक विश्लेषण करुन बेशुध्द व जखमी अवस्थेत मिळुन आलेल्या इसमाचे नाव गौरव सुरेश उदासी, रा. लेन नंबर २, डॉ. सुरेश उदासी हाऊस, रामपुरी, कॅम्प,
अमरावती याची असल्याचे व तो सध्या रा. साई हर्षीत पीजी, लेन नंबर २, गणपती हौसिंग सोसायटी, तुकारामनगर, खराडी, पुणे असे असल्याचे समजुन आले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्री. महादेव लिंगे यांनी मयत इसमास अज्ञात इसमाने जिवे ठार मारले असल्याने अज्ञात इसमाविरुध्द सरकारतर्फे भादंवि कलम ३०२ प्रमाणे फिर्याद
दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता.
नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपींचा तात्काळ शोध घेणेबाबत मा. वरिष्ठांनी आदेशित केले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे आदेशाने पोलीस नाईक अजित फरांदे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन व गोपनीय बातमीदारा मार्फत प्राप्त माहिती नुसार सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) भगवान सदाशिव केंद्रे, रा. भावडी रोड, वाघोली, पुणे
२) अमोल तुकाराम मानकर, रा. भावडी रोड, वाघोली, पुणे याने केला असलेबाबत माहिती प्राप्त झाल्याने व नमुद आरोपी हे परभणी जिल्हा व वाशिम जिल्हा येथे पळुन गेले असलेबाबत खात्रीशीर माहिती दिल्याने मा. श्री. गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ दोन टिम तयार करुन एक टिम परभणी जिल्हा येथे व एक टिम वाशिम जिल्हा येथे रवाना केली. त्यानंतर सपोनि निखील पवार व पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे, पोहवा बाळासाहेब सकाटे, पोशि अमोल ढोणे यांचे टिमने परभणी जिल्हा येथील गंगाखेड पोलीस स्टेशनकडील पोलीस स्टाफच्या मदतीने आरोपी नामे भगवान सदाशिव केंद्रे, रा. भावडी रोड, वाघोली, पुणे यास मु.पो. धारासुर, ता. गंगापुर, जि.परभणी येथुन ताब्यात घेतले. तसेच पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोना. अजित फरांदे, स्वप्निल जाधव, कैलास
साळुंके यांचे टिमने आरोपी नामे अमोल तुकाराम मानकर, रा. भावडी रोड, वाघोली, पुणे यास मु.पो. भुर, ता.मंगळुरपीर, जि. वाशिम येथुन ताब्यात घेतले. त्यानंतर नमुद आरोपींना लोणीकंद पोलीस स्टेशन येथे आणुन अधिकचौकशी केली असता नमुद आरोपींनी गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांना दाखल गुन्ह्यात अटक केलेली आहे. गुन्हयाचा
अधिक तपास श्री. मारुती पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. श्री. रंजनकुमार शर्मा सो, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर,मा. श्री. शशिकांत बोराटे सो, पोलीस उपआयुक्त सो, परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्री. किशोर जाधव सो,
सहा. पोलीस आयुक्त साो, येरवडा विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गजानन पवार सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, मा. श्री. मारुती पाटील सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे),लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, सपोनि निखिल पवार, सपोनि रविंद्र गोडसे, पोउपनिरी सुरज गोरे, पोउपनिरी
राहुल कोळपे, पोउपनिरी महादेव लिंगे, सहा. पोलीस फौजदार अस्लम अत्तार, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलीस नाईक विनायक साळवे, अजित फरांदे, कैलास साळुंके, स्वप्निल जाधव, सागर जगताप, पोलीस शिपाई अमोल ढोणे, साई रोकडे, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, सचिन चव्हाण, सुभाष भुरे, शंकर क्षीरसागर,
अशोक शेळके, तुषार पवार सर्व लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.




